मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Video: चेन्नई जिंकताच सारा-विकीचा जल्लोष; आता सोशल मीडियावर होतायत ट्रोल! नेमकं कारण काय?

Video: चेन्नई जिंकताच सारा-विकीचा जल्लोष; आता सोशल मीडियावर होतायत ट्रोल! नेमकं कारण काय?

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 30, 2023 10:48 AM IST

Vicky Kaushal and Sara Ali Khan Video: अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री सारा अली खान ही जोडी देखील त्यांच्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचली होती.

Vicky Kaushal and Sara Ali Khan
Vicky Kaushal and Sara Ali Khan

Vicky Kaushal and Sara Ali Khan Video: आयपीएल २०२३चा अंतिम सामना अतिशय रंजक ठरला होता. पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जच्या टीमने आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. या सामन्यादरम्यान अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री सारा अली खान ही जोडी देखील त्यांच्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचली होती. सुरुवातीला दोघेही गुजरात टायटन्स संघाला सपोर्ट करताना दिसले. पण, गुजरातच्या पराभवानंतर दोघेही चेन्नईच्या विजयाचा आनंद साजरा करताना दिसले. आता या प्रकरणावरून दोघांना ट्रोल केले जात आहे.

अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता विकी कौशल याआधी गुजरात टायटन्सला सपोर्ट करत होते. दोघेही संघाला चिअर करताना दिसले. राशिद खान आऊट झाल्यावर सारा अली खान खूपच नाराज झाली होती. तर, दुसरीकडे गुजरातच्या धावांवर विकीही आनंद व्यक्त करताना दिसला. पण, यानंतर जेव्हा चेन्नईने विजय मिळवला, तेव्हा विकीने जल्लोष करतानाचा व्हिडीओ शेअर करून या टीमचे अभिनंदन केले. विकी आणि सारा चेन्नईच्या विजयात साथ देत असल्याने आनंदी दिसत होते. मात्र, जेव्हा चाहत्यांच्या हे लक्षात आले, तेव्हा त्यांनी दोघांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.

Salman Khan: बॉलिवूडमध्ये पुन्हा रंगणार ‘खान’ वॉर? सलमानने नाकारली आमिर खानच्या चित्रपटाची ऑफर!

या व्हिडीओवर आता चाहत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यावर एका व्यक्तीने लिहिले की, ‘दोघेही अप्रतिम अभिनय करत आहेत. आधी ते जीटीला पाठिंबा देत होते.’ आणखी एका व्यक्तीने लिहिले की, ‘भाऊ, हे दोघे नक्की कुणाच्या बाजूने आहेत? षटकारावर आनंदी होतायत आणि विकेटवरही आनंदी होतायत.’ दुसर्‍या एक व्यक्तीने लिहिले की, ‘इतका खोटेपणा येतो तरी कुटून? ते कुठे बसले आहेत आणि कोणत्या संघाला पाठिंबा देत आहेत ते बघा!’

याशिवाय लोक सारा अली खानला देखील एका कारणासाठी ट्रोल करताना दिसले आहेत. खरं तर, काही महिन्यांपूर्वी शुभमन गिलने सारा अली खानबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्याने आपल्याला सारा आवडते, असे म्हटले होते. अशावेळी सारा मैदानावर सामना पाहत असताना शुभमन गिल लवकर आऊट झाला. सातत्याने चांगला खेळ करणारा शुभमन लवकर बाद होण्याचा संबंध आता लोकांनी साराशी जोडला आहे.

IPL_Entry_Point