मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Lock Upp 2: टीव्हीवर होणार डबल ड्रामा! कंगनाच्या ‘लॉकअप २’मध्ये कैद होणार राखी सावंत आणि शर्लिन चोप्रा!

Lock Upp 2: टीव्हीवर होणार डबल ड्रामा! कंगनाच्या ‘लॉकअप २’मध्ये कैद होणार राखी सावंत आणि शर्लिन चोप्रा!

Mar 10, 2023, 03:29 PM IST

  • Lock Upp 2 Update: ‘लॉकअप सीझन २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोबद्दल सध्या अनेक अपडेट्स समोर येत आहेत.

Lock Upp 2

Lock Upp 2 Update: ‘लॉकअप सीझन २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोबद्दल सध्या अनेक अपडेट्स समोर येत आहेत.

  • Lock Upp 2 Update: ‘लॉकअप सीझन २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोबद्दल सध्या अनेक अपडेट्स समोर येत आहेत.

Lock Upp 2 Update: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा शो ‘लॉकअप’ने २०२२मध्ये छोट्या पडद्यावर चांगलाच धुमाकूळ घातला होता. या शोने छोट्या पडद्यावर चांगलीच चर्चा निर्माण केली होती. या शोचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नव्या सीझनमध्येही अनेक नवे कलाकार पाहायला मिळणार आहेत. या मालिकेत ड्रामा क्वीन राखी सावंत आणि अभिनेत्री शर्लिन चोप्रा देखील या शोमध्ये दिसणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

कोरोना व्हॅक्सिन ठरलं अभिनेता श्रेयस तळपदेच्या हार्ट अटॅकच कारण? अभिनेता म्हणतो ‘खरं सांगू तर...’

झीरोतून बनले हिरो अन् उभी केली ‘टी सीरिज’ कंपनी! गुलशन कुमार यांची संघर्षकथा माहितीय का?

‘सोढी’ हरवलाय! आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या कलाकारांची दिल्ली पोलिसांकडून चौकशी होणार

सप्तसूर आणि गाणी रंगणार; आर्या आंबेकर, मामे खान आणि पूरबियान चॅटर्जी यांची मुंबईत मैफल भरणार!

‘लॉकअप सीझन २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोबद्दल सध्या अनेक अपडेट्स समोर येत आहेत. ‘लॉकअप’च्या या दुसऱ्या सीझनमध्ये अनेक बहुचर्चित कलाकार सामील होणार असल्याचे म्हटले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या नव्या सीझनमध्ये अभिनेत्री शर्लिन चोप्रा आणि राखी सावंत देखील दिसणार असल्याचे बोलले जात आहे. या शोसाठी निर्मात्यांनी दोन्ही अभिनेत्रींना विचारणा केल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी दोघींमधले वाद अतिशय चर्चेत आले होते. मात्र, आपापसांतील वाद मिटवून राखी आणि शर्लिन यांनी पुन्हा एकमेकींशी मैत्री केली होती.

काही दिवसांपूर्वी दोघींनी आपण एकमेकींच्या मैत्रिणी असल्याचे म्हटले आहे. यावेळी शर्लिन चोप्राला विचारण्यात आले की, तिची आणि राखीची मैत्री कशी झाली? तेव्हा शर्लिनने सांगितले की, राखीसोबत तिचे कधीही त्यांचे वैयक्तिक वैर नव्हते. मात्र, जेव्हा जेव्हा ती एखाद्या आरोपीविरुद्ध आवाज उठवायची, तेव्हा तेव्हा राखी तिच्या समोर यायची. शर्लिन पुढे म्हणाली की, जेव्हाही तिने साजिद खानच्या विरोधात आवाज उठवला, तेव्हा राखी त्याच्या बाजूने बोलायची.

शर्लिन पुढे म्हणाली, जेव्हा मी तिला काही व्हिडीओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग दाखवले, तेव्हा तिने विश्वास ठेवला आणि सांगितले की, आता मी तुझ्यासोबत आहे. शर्लिन चोप्राच्या तक्रारीवरूनच राखीला ताब्यात घेण्यात आले होते. पण, जेव्हा त्या दोघींची मैत्री झाली, तेव्हा राखीसोबत आदिलवरून सुरू असलेल्या वादातही शर्लिन राखीची साथ देताना दिसली. आता कंगनाच्या लॉकअपमध्ये या दोघी एकत्र बंद होणार असल्याने प्रेक्षकांना भरपूर ड्रामा बघायला मिळणार आहे.

विभाग