मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Chotya Bayochi Motthi Swapna: 'छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं'मधील अभिनेत्री आहे तरी कोण?

Chotya Bayochi Motthi Swapna: 'छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं'मधील अभिनेत्री आहे तरी कोण?

Aarti Vilas Borade HT Marathi

Sep 13, 2022, 03:18 PM IST

    • मालिकेतील तिचा गावाकडचा साधाभोळा पेहेराव प्रेक्षकांना विशेष भावतोय.
छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं (HT)

मालिकेतील तिचा गावाकडचा साधाभोळा पेहेराव प्रेक्षकांना विशेष भावतोय.

    • मालिकेतील तिचा गावाकडचा साधाभोळा पेहेराव प्रेक्षकांना विशेष भावतोय.

सोनी मराठी वाहिनीवर 'छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेची 'शिक्षणाच्या जिद्दीचा अनोखा प्रवास, बयोच्या प्रयत्नांना शिक्षणाची आस' या टॅग लाइनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या मालिकेत अभिनेत्री वीणा जामकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पण वीणा आहे तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Bharti Singh: ३ दिवस सतत त्रास झाल्यानंतर कॉमेडियन भारती सिंह रुग्णालयात दाखल, होणार सर्जरी

सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये खुलतय प्रेम, काय असेल सावनीचा नवा डाव? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार वाचा

Ajinkya Deo Birthday: अभिनेते अजिंक्य देव यांचा पहिला हॉलिवूड सिनेमा माहिती आहे का? जाणून घ्या त्यांच्याविषयी

'हिच्या पेक्षा तर उर्फी बरी...', करण कुंद्राची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश कपड्यांमुळे झाली ट्रोल

अनेक वर्ष सिनेमा आणि रंगभूमी याद्वारे आपली यशस्वी कारकिर्द घडवलेली अभिनेत्री वीणा जामकर आता छोट्या पडद्यावर आगमन करताना दिसते आहे. 'छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं' या सोनी मराठी वाहिनीवरल्या मालिकेत ती एका आगळ्यावेगळ्या अंदाजात दिसणार आहे. तिच्या भूमिकेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. तिचा गावाकडचा साधाभोळा पेहेराव प्रेक्षकांना विशेष भावतोय. कोकणातल्या नयनरम्य वातावरणात या मालिकेचं चित्रीकरण सुरू आहे.
आणखी वाचा : 'या' दिवशी होणार चंद्रमुखी सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

याबाबत बोलताना वीणा असं म्हणाली की, "छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं ही माझी पहिली टेलिव्हिजन मालिका आहे. निर्माते संतोष भरत कनिकर यांनी मला दर्जेदार मालिकेची ऑफर दिली त्यामुळे त्यांचे आभार. माझी ही मालिका लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आवडेल यांत शंका नाही. सोनी मराठी वाहिनीवर सुरू होणाऱ्या या मालिकेतून माझा टेलिव्हिजनवरला प्रवास सुरू होतो आहे, याचा मला अतिशय आनंद होतो आहे. पहिलीच मालिका असल्याने मी खरंच खूप उत्सुक आहे, आशा करते की, रसिक प्रेक्षकही माझ्यावर आणि माझ्या या भूमिकेवर नक्कीच भरभरून प्रेम करतील."

विभाग