मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Chandramukhi: 'या' दिवशी होणार चंद्रमुखी सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

Chandramukhi: 'या' दिवशी होणार चंद्रमुखी सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 12, 2022 01:24 PM IST

Amruta Khanvilkar: दृष्ट लागावी अशी चंद्रा-दौलतची प्रेमकहाणी पहिल्यांदाच पाहायला मिळणार छोट्या पडद्यावर

चंद्रमूखी
चंद्रमूखी (HT)

'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाला प्रेक्षक, समीक्षक आणि सिनेसृष्टीमधून भरभरून प्रतिसाद मिळाला. चित्रपटातील भन्नाट गाण्यांनी तर प्रेक्षकांची मने जिंकली. आता हा चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे.

सुपरहिट सिनेमांची मेजवानी देत प्रेक्षकांचा रविवार खास बनवणाऱ्या प्रवाह पिक्चरवर २५ सप्टेंबरला ब्लॉकबस्टर चंद्रमुखी सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर भेटीला येणार आहे. लेखक विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी कादंबरीवर हा सिनेमा बेतलेला असून राजकारणी दौलत देशमाने आणि लावणी कलावंत चंद्रा यांची प्रेमकहाणी सिनेमात पाहायला मिळेल.
आणखी वाचा : 'मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला..', प्राजक्ताचा आनंद गगनात मावेना

या सिनेमातलं चंद्रा हे गाणं आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अजय-अतुलचं संगीत आणि चंद्रा म्हणजेच अमृता खानविलकरच्या दिलखेचक अदांनी या गाण्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. चंद्राच्या या अदा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरच्या निमित्ताने प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहेत.

पदार्पणातच प्रवाह पिक्चर वाहिनीला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद अभूतपूर्व आहे. पावनखिंड, झिम्मा, कारखानिसांची वारी, स्टेपनी, बळी या सिनेमांच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर नंतर आता उत्सुकता आहे चंद्रमुखी सिनेमाची. तेव्हा चंद्राची जादू पुन्हा एकदा अनुभवायला २५ सप्टेंबरला दुपारी १ वाजता प्रवाह पिक्चरवर मिळणार आहे.

'चंद्रमुखी' या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे. चिन्मय मांडलेकर यांची पटकथा-संवाद असलेल्या या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, मृण्मयी देशपांडे यांच्यासोबतच मोहन आगाशे, राजेंद्र शिसतकर, समीर चौघुले, नेहा दंडाळे, सुरभी भावे, राधा सागर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे छायाचित्रण संजय मेमाणे यांनी केले आहे.

IPL_Entry_Point

विभाग