मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Brahmastra: ब्रह्मास्त्र ठरला सर्वाधिक कमाई करणारा वर्षातील दुसरा चित्रपट

Brahmastra: ब्रह्मास्त्र ठरला सर्वाधिक कमाई करणारा वर्षातील दुसरा चित्रपट

Aarti Vilas Borade HT Marathi

Sep 18, 2022, 11:41 AM IST

    • Brahmastra box office collection day 9: ब्रह्मास्त्र चित्रपटाने भूल भूलैय्या २ या चित्रपटाला मागे टाकले आहे.
ब्रह्मास्त्र (HT)

Brahmastra box office collection day 9: ब्रह्मास्त्र चित्रपटाने भूल भूलैय्या २ या चित्रपटाला मागे टाकले आहे.

    • Brahmastra box office collection day 9: ब्रह्मास्त्र चित्रपटाने भूल भूलैय्या २ या चित्रपटाला मागे टाकले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा बहुचर्चित 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जीने केले आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे. त्यानंतर आता चित्रपटाने आणखी एक रेकॉर्ड केला आहे. वर्षभरात सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा चित्रपट ठरला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रोमान्स ते क्राईम; आठवडाभर ओटीटीवर असणार धुमाकूळ! पाहा काय काय होतंय रिलीज

अंतराची अंगठी घेण्यासाठी अभिराम लीला शोधून काढणार? ‘नवरी मिळे हिटलर’ला मालिकेत येणार नवा ट्वीस्ट

प्रियाचा चोंबडेपणा सायलीला पडणार भारी! द्यावी लागणार प्रेमाची परीक्षा; ‘ठरलं तर मग’मध्ये येणार वळण!

परदेशवारी करणाऱ्या मुक्ता बर्वेला येतेय मायदेशाची आठवण! पोस्ट लिहित म्हणाली, ‘मी आत्ता भारतात नाहीये…’

ब्रह्मास्त्र चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले आहेत. पण चित्रपटाची लोकप्रियता कायम आहे. जभरात चित्रपटाने ३०० कोटी रुपये कामावले आहेत. तसेच भारतात चित्रपटाने २०० कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे.
वाचा: शाहरुख खानच्या लेकाच्या प्रेमात ही अभिनेत्री, शेअर केला फोटो

बॉक्स ऑफिस इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, दुसऱ्या आठवड्यातील शनिवारी चित्रपटाने जवळपास १५.२५ ते १६.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यासोबतच एकूण १९८ कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाने भूल भूलैय्या २ या चित्रपटाला आता कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे. भूल भूलैय्या २ने जवळपास १८५ कोटी रुपये कमावले होते.

९ सप्टेंबर २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या ब्रह्मास्त्र चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जीने केले आहे. या चित्रपटासाठी अयानने जवळपास ८ वर्षे घालवली. या चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor), आलिया भट्ट (Alia Bhatt), नागार्जुन (nagarjuna), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि मौनी रॉय (Mouni Roy) हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. ब्रह्मास्त्र चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाचा दुसरा भाग 'ब्रह्मास्त्र २: देव' याची आतुरतेने वाट पाहात आहेत.

विभाग