मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aryan Khan: शाहरुख खानच्या लेकाच्या प्रेमात ही अभिनेत्री, शेअर केला फोटो

Aryan Khan: शाहरुख खानच्या लेकाच्या प्रेमात ही अभिनेत्री, शेअर केला फोटो

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 17, 2022 09:08 AM IST

अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला आर्यन खानचा फोटो शेअर केला आहे.

सजल
सजल (HT)

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा लेक आर्यन खान गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. मग ते ड्रग्स प्रकरण असो किंवा एका जाहिरातीसाठी केलेले फोटोशूट असो. आर्यन सतत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. आता चक्क एक अभिनेत्री आर्यन खानच्या प्रेमात आहे. तिने आर्यनचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आर्यन खानचा फोटो सोशल मीडियावर शेअर करणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. ही अभिनेत्री बॉलिवूडमधील नसून पाकिस्तानी आहे. मात्र तिने बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीसोबत 'मॉम' चित्रपटात दिसली होती.
आणखी वाचा : नागार्जुनने मुलगा नागाचैतन्य आणि समांथाच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला...

<p>सहज</p>
सहज (HT)

या अभिनेत्रीचे नाव सजल असे आहे. ही अभिनेत्री पाकिस्तानमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला आर्यन खानचा फोटो शेअर केला होता. त्यासोबतच हार्ट इमोजी वापरला होता. तिच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले होते. अनेकांनी तिला या पोस्टबाबात विचारले देखील.

सजल ही पाकिस्तानमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिला अनेक अवॉर्ड्स देखील मिळाले आहेत. तिने २०२२ साली को-स्टार अहद रजासोबत लग्न केले.

IPL_Entry_Point

विभाग