मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: सलमान खानने चाहत्यांना दिली गुडन्यूज! फोटो शेअर करत म्हणाला...

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: सलमान खानने चाहत्यांना दिली गुडन्यूज! फोटो शेअर करत म्हणाला...

Feb 08, 2023, 05:02 PM IST

    • Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Film Update: सलमान खानने त्याच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाबद्दल नवी अपडेट दिली आहे.
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Film Update: सलमान खानने त्याच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाबद्दल नवी अपडेट दिली आहे.

    • Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Film Update: सलमान खानने त्याच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाबद्दल नवी अपडेट दिली आहे.

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Film Update: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या चित्रपटांची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असतात. सलमान खानच्या चित्रपटात मनोरंजन, कॉमेडी, अॅक्शन, रोमान्स सगळा मसाला असतो. आता चाहते आणि प्रेक्षक सलमानच्या बहुप्रतीक्षित ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाची वाट बघत आहेत. आता स्वत: सलमान खानने त्याच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाबद्दल नवी अपडेट दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

स्मिता तांबे घडवणार शेतकऱ्यांच्या जगण्याचं दर्शन! शेतकऱ्याची व्यथा सांगणाऱ्या ‘कासरा’चा ट्रेलर पाहिलात का?

रोमान्स ते क्राईम; आठवडाभर ओटीटीवर असणार धुमाकूळ! पाहा काय काय होतंय रिलीज

अंतराची अंगठी घेण्यासाठी अभिराम लीला शोधून काढणार? ‘नवरी मिळे हिटलर’ला मालिकेत येणार नवा ट्वीस्ट

प्रियाचा चोंबडेपणा सायलीला पडणार भारी! द्यावी लागणार प्रेमाची परीक्षा; ‘ठरलं तर मग’मध्ये येणार वळण!

सलमान खान याने सोशल मीडिया अकाऊंटवर नुकताच एक फोटो शेअर करत सांगितले की, त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. आता हा चित्रपट २०२३मध्ये ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आणि चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याची बातमी ऐकून चाहते खूप उत्साहित झाले आहेत.

अभिनेत्री पूजा हेगडे या चित्रपटात सलमान खानसोबत पहिल्यांदाच ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. व्यंकटेश दग्गुबती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर हे कलाकार देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट २०२३च्या ईदला प्रदर्शित होणार आहे.

फरहाद सामजी यांनी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. सलमानच्या इतर अनेक चित्रपटांप्रमाणेच हा ॲक्शन पट आहे. याशिवाय कॉमेडी, नाट्यमय घटना, रोमान्स आणि इमोशनचा तडकाही आहे. बिग बॉस फेम शहनाज गिल देखील या चित्रपटात दिसणार आहे.

विभाग