मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tula Shikvin Changlach Dhada: ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मधून शिवानी आणि हृषिकेशची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला!

Tula Shikvin Changlach Dhada: ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मधून शिवानी आणि हृषिकेशची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 08, 2023 04:17 PM IST

Tula Shikvin Changlach Dhada : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आणि सोशल मीडियावर याची चर्चा सुरू झाली आहे.

Tula Shikvin Changlach Dhada
Tula Shikvin Changlach Dhada

Tula Shikvin Changlach Dhada : मराठी मालिका विश्वात सध्या अनेक नव्या मालिकांची भर पडत आहे. यात आता आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या नव्या मालिकेचा प्रोमो चर्चेत आला आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आणि सोशल मीडियावर याची चर्चा सुरू झाली आहे. या मालिकेतून अभिनेता हृषिकेश शेलार आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिका विश्वातील ही नवी जोडी सध्या चर्चेचा विषय ठरतेय.

या मालिकेच्या निमित्ताने अजून एक सरप्राईझ प्रेक्षकांसाठी असणार आहे ते म्हणजे हृषिकेश आणि शिवानी सोबत कविता लाड-मेढेकर आणि विजय गोखले हे देखील मध्यवर्ती भूमिकेत असणार आहेत. कविता लाड आणि विजय गोखले बऱ्याच काळानंतर मालिका विश्वात झळकणार आहेत.

या मालिकेची कथा देखील हटके आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका आहे, एका शिक्षिकेची म्हणजेच अक्षराची जी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे, आणि अधिपतीची जो कमी शिकलेला पण गर्भश्रीमंत आहे. अक्षरा सुंदर, सुशिक्षित, गुणी आणि तत्वनिष्ठ मुलगी आहे. तिची शिक्षणाविषयी ठाम भूमिका आहे. शिक्षण फक्त प्रगती करत नाही, तर चरित्र घडवतं. शिक्षण तुमच्या निर्णय क्षमतेवर परिणाम करते, असे तिचे म्हणणं आहे, म्हणून तिने शिक्षण क्षेत्र स्विकारलं.

तर, दुसरीकडे मालिकेचा नायक अधिपतीचे अनेक व्यवसाय आहे. त्याच्या मालकीची एक शाळा देखील आहे. पण, त्याने नववीनंतर शिक्षण सोडलं. कारण, त्याच्या आईच म्हणणं आहे की, शिक्षणाने कुणाचं भलं होत नाही. शिक्षण हे गरिबांसाठी असतं, त्यामुळे त्यांना नोकरी लागते, असा त्यांचा समाज आहे. अधिपतीसाठी शिक्षण कधीही त्याच्या आड आलं नाही. कारण त्याने अनेक व्यवसाय यशस्वीपणे केले आहेत. अधिपतीचं आईवर खूप प्रेम आहे. अधिपती अक्षराच्या प्रेमात पडला, पण मनातून खुश नसूनही आईने त्या दोंघाच लग्न लावून दिलंय.

कोल्हापुरात घडणाऱ्या या मालिकेचं लेखन मधुगंधा कुलकर्णी हिने केलंय. शर्मिष्ठा राऊत या मालिकेच्या निमित्ताने प्रथमच निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे.

IPL_Entry_Point

विभाग