मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sidharth-Kiara Wedding: राम चरणच्या पत्नीने मागितली कियारा-सिद्धार्थची माफी; पाहा नेमकं काय झालं...

Sidharth-Kiara Wedding: राम चरणच्या पत्नीने मागितली कियारा-सिद्धार्थची माफी; पाहा नेमकं काय झालं...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 08, 2023 03:54 PM IST

Sidharth-Kiara Wedding: साऊथ सुपरस्टार राम चरणची पत्नी उपासना हिने देखील कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Sidharth-Kiara Wedding
Sidharth-Kiara Wedding

Sidharth-Kiara Wedding: बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा अखेर विवाहबद्ध झाले आहेत. दोघांनी ७ फेब्रुवारीला जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थित विवाह केला. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या या फोटोंवर लोक भरपूर कमेंट करत आहेत आणि बी-टाऊनच्या या नवीन जोडीला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत. करण जोहरपासून ते कतरिना कैफ आणि आलिया भट्ट यांनीही कियारा-सिद्धार्थला लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान, साऊथ सुपरस्टार राम चरणची पत्नी उपासना हिने देखील कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पण, उपसानाने शुभेच्छा दिल्यानंतर दोघांची माफी देखील मागितली आहे. उपासनाने कियारा आणि सिद्धार्थ यांच्या लग्नाला उपस्थित न राहिल्यामुळे त्यांची माफी मागितली आहे. कियारा अडवाणीच्या फोटोंवर कमेंट करताना उपासनाने लिहिले की, ‘अभिनंदन, ही जोडी खूप सुंदर आहे. पण आम्हाला माफ करा. कारण, आम्ही या लग्नाला उपस्थित राहू शकलो नाही.’

कियारा अडवाणीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नातील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये कियाराने फिकट गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. त्यावर छान अशी ज्वेलरी घातली आहे. नवरीच्या या लूकमध्ये कियारा अतिशय सुंदर दिसत आहे. तर, सिद्धार्थने फिकट सोनारी रंगाची शेरवानी घातली आहे.

कियाराने सोशल मीडियावर तीन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये ते एकमेकांसमोर हात जोडताना दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये हसत आहेत आणि तिसऱ्या फोटोमध्ये सिद्धार्थ कियाराच्या गालावर किस करताना दिसत आहे.

IPL_Entry_Point