मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kiara Advani’s Duplicate : कियारा अडवाणीची कॉपी आहे ‘या’ दिग्दर्शकाची लेक; फोटो पाहून तुम्ही देखील चक्रवाल!

Kiara Advani’s Duplicate : कियारा अडवाणीची कॉपी आहे ‘या’ दिग्दर्शकाची लेक; फोटो पाहून तुम्ही देखील चक्रवाल!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 08, 2023 11:37 AM IST

Kiara Advani’s Look Alike : नुकतंच अभिनेत्री कियारा अडवाणी हिचं लग्न थाटामाटात पार पडलं आणि दुसरीकडे काहीच दिवसांपूर्वी तिच्या सारख्या दिसणाऱ्या अभिनेत्री तनिषा संतोषी हिचा पहिलावहिला चित्रपट रिलीज झाला आहे.

Kiara-Tanisha
Kiara-Tanisha

Kiara Advani’s Look Alike : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आणि अभिनेते आहे, ज्यांचे चेहरे इतके मिळते जुळते आहेत की, ते एकमेकांचे कॉपीच वाटतात. नुकतंच अभिनेत्री कियारा अडवाणी हिचं लग्न थाटामाटात पार पडलं आणि दुसरीकडे काहीच दिवसांपूर्वी तिच्या सारख्या दिसणाऱ्या अभिनेत्री तनिषा संतोषी हिचा पहिलावहिला चित्रपट रिलीज झाला आहे. या निमित्ताने दोघीही चर्चेत आल्या आहेत. कियारा अडवाणीची लूक अ लाईक असणारी अभिनेत्री तनिषा संतोषी ही बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते राजकुमार संतोषी यांची मुलगी आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'गांधी गोडसे-एक युद्ध' या चित्रपटातून अभिनेत्री तनिषा संतोषी हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. पहिल्याच चित्रपटातून तिने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. तनिषा संतोषी हिने अभिनेत्री म्हणून पदार्पण करण्यापूर्वी अभिनेता शाहिद कपूर याच्या ‘फटा पोस्टर निकला हिरो’ या चित्रपटामध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. या चित्रपटातील तनिषाचा पहिला लूक रिलीज झाला तेव्हा, अनेकांना ती कियारा अडवाणी वाटली. तर, काहींनी तिला कियाराची जुळी बहीण देखील म्हटले होते.

अभिनेत्री कियारा अडवाणी हिच्याशी तुलना होण्याविषयी तनिषाने देखील आपले मत व्यक्त केले आहे. याविषयी बोलताना तनिषा म्हणाली की, मी कियारा सारखी दिसते, असे मला वाटत नाही. मात्र, मी सगळ्या गोष्टींचा अतिशय सकारत्मकतेने विचार करते. कियारा खूप सुंदर आहे. तिचा आतापर्यंतचा प्रवास खूप प्रभावशाली आहे. तिला यश थोडे उशिरा मिळाले, पण तिने जिद्द सोडली नाही. मला तिच्याकडून खूप काही शिकायला मिळाले, त्यामुळे मी ही तुलना सकारात्मक पद्धतीने घेतली आहे.

तनिषाने वडील राजकुमार संतोषी यांच्या ‘गांधी गोडसे-एक युद्ध’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. आपल्या करिअर प्लॅनिंग विषयी बोलताना तनिषा म्हणाली की, वडिलांव्यतिरिक्त तिला संजय लीला भन्साळी, राजकुमार हिरानी, शकुन बत्रा, विक्रम आदित्य मोटवानी आणि आनंद राय यांसारख्या प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकांसोबत काम करायचे आहे, तर जर कलाकारांबद्दल बोलायचे झाले तर तिला रणबीर कपूरसोबत काम करायला आवडेल. तर, वरुण धवन, कार्तिक आर्यन यांच्यासारख्या आघाडीच्या अभिनेत्यांसोबत तिला स्क्रीन शेअर करायची आहे.

IPL_Entry_Point

विभाग