मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rang Maza Vegla: दीपाच्या मैत्रिणीचा मृत्यू; कार्तिकवर आला आळ! ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत ट्वीस्ट

Rang Maza Vegla: दीपाच्या मैत्रिणीचा मृत्यू; कार्तिकवर आला आळ! ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत ट्वीस्ट

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 08, 2023 12:51 PM IST

Rang Maza Vegla latest update: दीपा आणि कार्तिक यांनी पुन्हा एकदा नव्याने आपल्या संसाराला सुरुवातील केली होती. मात्र, आता त्यांच्या संसारात मोठं वादळ आलं आहे.

Rang Maza Vegla
Rang Maza Vegla

Rang Maza Vegla latest update: मालिका विश्वात सध्या ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका चांगलीच चर्चेत आली आहे. या मालिकेने सध्या प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं आहे. या मालिकेत सध्या अनेक ट्वीस्ट आणि टर्न्स पाहायला मिळत आहेत. नुकताच या मालिकेत एक पॉझिटिव्ह ट्रक सुरू झाला होता. आपापसांतील सगळे हेवेदावे विसरून दीपा आणि कार्तिक यांनी पुन्हा एकदा नव्याने आपल्या संसाराला सुरुवातील केली होती. मात्र, आता त्यांच्या संसारात मोठं वादळ आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नुकतीच मालिकेत डॉ. कार्तिक याला अटक करण्यात आली आहे. दीपाची जवळची मैत्रीण साक्षी हिचा त्यांच्या आदित्य हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. तिच्या मृत्यूचा आरोप कार्तिकवर लावण्यात आला आहे. दीपाची मैत्रीण साक्षी ही गेल्या अनेक दिवसांपासून पोटदुखीने त्रस्त झाली होती. अचानक तिच्या पोटात दुखू लागल्याने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी तिच्या पोटातील अल्सर फुटल्याने तिला लगेच शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. वेळेवर डॉक्टर पोहचू न शकल्याने कार्तिकने स्वतः तिचे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला होता.

कार्तिकने वेळेवर साक्षीचं ऑपरेशन केलं. मात्र, या ऑपरेशन आधीच दीपावरून साक्षी आणि कार्तिकमध्ये जोरदार वाद झाले होते. याच वादानंतर साक्षीला अचानक चक्कर आली आणि ती बेशुद्ध झाली. दरम्यान तिच्या पोटातील अल्सर देखील फुटला. यानंतर कार्तिकने तिचं ऑपरेशन केलं. मात्र, ऑपरेशननंतर तिचा मृत्यू झाला. साक्षीच्या चिडलेल्या पतीने कार्तिकवर खुनाचा आरोप केला आहे.

साक्षीच्या पतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कार्तिकला अटक केली असून, आता कार्तिक पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात अडकणार आहे. यावेळी दीपाने देखील कार्तिकची बाजू घेण्यास होकार दिलेला नसल्याने आता कार्तिक मोठ्या संकटात अडकला आहे. आता पोलीस कार्तिकवर लागलेल्या आरोपांवरून पुढे त्याच्यावर काय कारवाई करण्यार हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये कळणार आहे.

IPL_Entry_Point