मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rakhi Sawant: लव्ह जिहादच्या प्रश्नावर संतापली राखी सावंत! आदिलची बाजू घेत म्हणाली...

Rakhi Sawant: लव्ह जिहादच्या प्रश्नावर संतापली राखी सावंत! आदिलची बाजू घेत म्हणाली...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 08, 2023 12:10 PM IST

Rakhi Sawant talks about Love Jihad: एका मुलाखतीत राखीने श्रद्धा वालकर प्रकरणाचा उल्लेख केला होता. याचाच आधार घेऊन राखीला 'लव्ह जिहाद'बद्दल प्रश्न विचारण्यात आला.

Rakhi Sawant
Rakhi Sawant

Rakhi Sawant talks about Love Jihad: बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत तिच्या लग्नामुळे प्रचंड चर्चेत आली आहे. एकीकडे राखीने आपल्या पाटीवर अर्थात आदिल खान दुर्राणी याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. मात्र, नुकत्याच एका मुलाखतीत राखी सावंत पुन्हा एकदा आदिल खान याची बाजू घेताना दिसली आहे. एका मुलाखतीत राखीने श्रद्धा वालकर प्रकरणाचा उल्लेख केला होता. याचाच आधार घेऊन राखीला 'लव्ह जिहाद'बद्दल प्रश्न विचारण्यात आला. मात्र, या प्रश्नावर राखी संतापली.

ट्रेंडिंग न्यूज

राखी सावंतला विचारण्यात आले की, तिचा नवरा आदिल खान याने 'लव्ह जिहाद' करण्याच्या उद्देशाने हे सर्व केले आहे, असे तिला वाटते का? तर, राखी सावंत संतापली आणि म्हणाली की, ‘मी स्वतः मुस्लिम आहे. मी इस्लामचा स्वीकार केला आहे. हिंदू-मुस्लिम धर्माबद्दल मला काहीही बोलायचे नाही.’ यानंतर राखी सावंत चिडून तिथून निघून गेली. राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. कमेंट सेक्शनमध्ये लोक राखी सावंतचे जोरदार कौतुक करत आहेत.

राखी सावंत हिने पती आदिल दुर्राणीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. याशिवाय तिने आदिल विरोधात एफआयआर देखील दाखल केला आहे. आदिलने लग्नाच्या नावाखाली तिच्याकडून सर्व दागिने आणि पैसे घेतल्याचेही राखीने पोलिसांना सांगितले आहे. पोलिसांत एफआयआर नोंदवण्यापूर्वी राखीने आदिलबद्दल मीडियाशी बोलताना सांगितले की, आदिलने राखीकडून तिच्या घराच्या चाव्या आणि पैसे हिसकावून घेतले आहेत आणि आता त्या परत करण्यास नकार देत आहे.

बॉलिवूडमध्ये नाव कमवण्यासाठी त्याने माझा वापर केला आहे. माझ्याकडे असलेले सर्व पैसे त्याने काढून घेतले, असाही दावा राखीने केला आहे. राखीने माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, आदिलने गर्लफ्रेंड तनुसोबत राहण्याचा निर्णय घेतला असून, त्याने आपली साथ सोडली आहे. राखी सावंत हिने पती आदिल दुर्राणीविरुद्ध मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर त्याला ओशिवरा पोलिसांनी अटक केली होती.

IPL_Entry_Point

विभाग