मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kangana Ranaut: हृतिक की दिलजीत कोण आवडतं?; कंगनाने दिलेल्या उत्तराने वेधले सर्वांचे लक्ष

Kangana Ranaut: हृतिक की दिलजीत कोण आवडतं?; कंगनाने दिलेल्या उत्तराने वेधले सर्वांचे लक्ष

Aarti Vilas Borade HT Marathi

Feb 21, 2023, 09:22 AM IST

    • Hrithik Roshan: कंगना आणि हृतिक रोशन यांच्यामधील वाद हा जगजाहीर आहे. त्यामुळे एका चाहत्याने मुद्दाम कंगनाला हृतिक की दिलजीत पैकी कोण आवडतं? असा प्रश्न विचारला आहे.
कंगना रणौत (HT)

Hrithik Roshan: कंगना आणि हृतिक रोशन यांच्यामधील वाद हा जगजाहीर आहे. त्यामुळे एका चाहत्याने मुद्दाम कंगनाला हृतिक की दिलजीत पैकी कोण आवडतं? असा प्रश्न विचारला आहे.

    • Hrithik Roshan: कंगना आणि हृतिक रोशन यांच्यामधील वाद हा जगजाहीर आहे. त्यामुळे एका चाहत्याने मुद्दाम कंगनाला हृतिक की दिलजीत पैकी कोण आवडतं? असा प्रश्न विचारला आहे.

बॉलिवूडची क्वीनची म्हणून अभिनेत्री कंगना रणौत ओळखली जाते. ती सामाजिक विषयांवर बिनधास्तपणे तिचे मत मांडताना दिसते. कधीकधी तिला या सगळ्यामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. आता तिने ट्विटरच्या @AdkMeAnythingच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला आहे. दरम्यान, एका यूजरने विचारलेल्या प्रश्नाने तिचे लक्ष वेधले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

स्मिता तांबे घडवणार शेतकऱ्यांच्या जगण्याचं दर्शन! शेतकऱ्याची व्यथा सांगणाऱ्या ‘कासरा’चा ट्रेलर पाहिलात का?

रोमान्स ते क्राईम; आठवडाभर ओटीटीवर असणार धुमाकूळ! पाहा काय काय होतंय रिलीज

अंतराची अंगठी घेण्यासाठी अभिराम लीला शोधून काढणार? ‘नवरी मिळे हिटलर’ला मालिकेत येणार नवा ट्वीस्ट

प्रियाचा चोंबडेपणा सायलीला पडणार भारी! द्यावी लागणार प्रेमाची परीक्षा; ‘ठरलं तर मग’मध्ये येणार वळण!

कंगनाने 'ठिक आहे, मला प्रश्न विचारा... चंद्रमुखी चित्रपटाच्या सेटवर लंच ब्रेक आहे. मी पहिले असे कधीच केलेले नाही. पण आता करण्यात हरकत नाही #AskKangana' या आशयाचे ट्वीट कंगनाने केले आहे. त्यावर अनेक यूजर्सनी कंगनाला प्रश्न विचारले. दरम्यान, एका यूजरने 'तुझा आवडता कोण? १. हृतिक रोशन २.दिलजीत दोसांझ' असा प्रश्न विचारला. यूजरच्या या प्रश्नाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
वाचा: कशी आहे अनिल कपूर-आदित्य रॉय कपूरची सीरिज? जाणून घ्या

यावर कंगनाने, 'माझ्या मते यामधील एक व्यक्ती अॅक्शन करतो आणि दुसरा व्हिडीओ साँग करतो. खरं सांगू तर त्याला कधीच अभिनय करताना पाहिले नाही. मी तेव्हाच उत्तर देऊ शकते जेव्हा त्यांना अभिनय करताना पाहू शकते. जर भविष्यात असे घडले तर मला नक्की सांगा.. धन्यवाद' या आशयाचे ट्वीट केले.

हृतिक रोशन आणि दिलजीत या दोघांसोबतही कंगनाचे वाद झाले आहेत. दोघांसोबत झालेली भांडणे ही चर्चेत होती. हृतिक रोशनसोबत कंगनाच्या अफेअरच्या चर्चा या जगजाहिर होत्या. त्यानंतर किसान आंदोलनच्या वेळी दिलजीत केलेल्या ट्वीटमुळे त्या दोघांमध्ये ट्विटर वॉर सुरु होते.

विभाग