मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  The Night Manager Review : कशी आहे अनिल कपूर-आदित्य रॉय कपूरची सीरिज? जाणून घ्या

The Night Manager Review : कशी आहे अनिल कपूर-आदित्य रॉय कपूरची सीरिज? जाणून घ्या

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 20, 2023 06:43 PM IST

The night manager review: 'द नाईट मॅनेजर' ही सीरिज नुकताच प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमध्ये अनिल कपूर आणि आदित्य रॉय कपूर महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या सीरिजमध्ये नेमकं काय पाहायला मिळणार जाणून घ्या...

द नाईट मॅनेजर
द नाईट मॅनेजर (HT)

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते अनिल कपूर आणि आदित्य रॉय कपूर महत्त्वाच्या भूमिकेत असणारी 'द नाईट मॅनेजर' ही सीरिज नुकताच प्रदर्शित झाली आहे. या सीरिजची चाहते आतुरतेने वाट पाहात होते. ही सीरिज एका ब्रिटीश टीव्ही सीरिजचा रिमेक आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झालेल्या या सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण काय आहे या सीरिजची कथा? चला जाणून घेऊया...

काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये आदित्य हॉटेलमध्ये काम करताना दिसत होता. आता या व्हिडीओमागचे सत्य समोर आले आहे. नाइट मॅनेजर या सीरिजमध्ये आदित्य या नाईट मॅनेजरची भूमिका साकारत आहे. त्याच्या भूमिकेचे नाव सेनगुप्ता असे आहे. जो एक्स नेवी ऑफिसर आहे.
वाचा: मी दिया मिर्झा...; लग्नाच्या वेळी मराठी घेतली शपथ! व्हिडीओ व्हायरल

सीरिजची सुरुवात ही एका बिझनेसमॅनची १४ वर्षांची बेगम सफीनाने होते. सफीनाला तिच्या देशात, भारतात परत जायचे असते. मात्र पतीमुळे तिला हॉटेलमधील एक खोलीत कैद करण्यात येते. याच हॉटेलमध्ये आदित्य रॉय कपूर हा नाईट मॅनेजर म्हणून काम करत असतो. सीरिजची कथा जशी जशी पुढे सरकते तसे नवीन ट्वीस्ट येतात. या सीरिजमध्ये शैली म्हणजेच शेलेंद्र रुंगटा हा खलनायक आहे. अनिल कपूर या भूमिकेत दिसत आहे. तो भारतातील सर्वात मोठा बिझनेसमॅन आहे. तो हत्यारांचा काळाबाजर करत असतो. RAWला मिळालेल्या माहितीमुळे शैलीवर संशय येतो आणि सीरिजची कथा पूर्णपणे बदलते.

अनिल कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांच्यासोबत अभिनेत्री शोभिता धूलिपाला दिसत आहे. शोभिताच्या सीरिजमधील बोल्ड लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ही एक सस्पेंस सीरिज आहे. या सीरिजचा दुसरा सिझन जून २०२३मध्ये येणार आहे.

WhatsApp channel

विभाग