मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Oscar Trophy : ऑस्करची 'ती' बाहुली खरंच सोन्याची असते का? काय आहे सत्य जाणून घ्या...

Oscar Trophy : ऑस्करची 'ती' बाहुली खरंच सोन्याची असते का? काय आहे सत्य जाणून घ्या...

Aarti Vilas Borade HT Marathi

Mar 13, 2023, 10:12 AM IST

  • Oscar Award Trophy Truth : ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात विजेत्या कलाकाराला एक ट्रॉफी दिली जाते. ही सोनेरी बाहुली मिळवण्याचा अनेक कलाकारांचा प्रयत्न असतो. पण ही बाहुली सोन्याची असते का? असा प्रश्न अनेकांना पडतो.

ऑस्कर (HT)

Oscar Award Trophy Truth : ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात विजेत्या कलाकाराला एक ट्रॉफी दिली जाते. ही सोनेरी बाहुली मिळवण्याचा अनेक कलाकारांचा प्रयत्न असतो. पण ही बाहुली सोन्याची असते का? असा प्रश्न अनेकांना पडतो.

  • Oscar Award Trophy Truth : ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात विजेत्या कलाकाराला एक ट्रॉफी दिली जाते. ही सोनेरी बाहुली मिळवण्याचा अनेक कलाकारांचा प्रयत्न असतो. पण ही बाहुली सोन्याची असते का? असा प्रश्न अनेकांना पडतो.

Oscar Award Trophy : चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा सजमला जाणारा पुरस्कार सोहळा म्हणजे 'ऑस्कर.' जगभरातील कलाकार या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहात असतात. या पुरस्कार सोहळ्यात विजेत्या कलाकाराला एक ट्रॉफी दिली जाते. ही सोनेरी बाहुली मिळवण्याचा अनेक कलाकारांचा प्रयत्न असतो. पण ही सोनेरी बाहुली खरंंच सोन्याची असते का? त्या ट्रॉफीची किंमत किती रुपये आहे? असा प्रश्न अनेकांना पडतो.

ट्रेंडिंग न्यूज

Bharti Singh: ३ दिवस सतत त्रास झाल्यानंतर कॉमेडियन भारती सिंह रुग्णालयात दाखल, होणार सर्जरी

सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये खुलतय प्रेम, काय असेल सावनीचा नवा डाव? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार वाचा

Ajinkya Deo Birthday: अभिनेते अजिंक्य देव यांचा पहिला हॉलिवूड सिनेमा माहिती आहे का? जाणून घ्या त्यांच्याविषयी

'हिच्या पेक्षा तर उर्फी बरी...', करण कुंद्राची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश कपड्यांमुळे झाली ट्रोल

ऑस्कर पुरस्कार सोहळा आजोजित केल्यानंतर त्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. यंदा या पुरस्काराचे ९४ वे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही लॉस एंजेलिसमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला.
वाचा: भारताने बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फ्लिम या श्रेणीत मारली बाजी

ऑस्कर

रिपोर्सट्स नुसार, ऑस्कर विजेत्या कलाकाराला मिळालेली सोनेरी रंगाची बाहुली ही तांब्याची असते. त्यावर २४ कॅरेट सोन्याचा एक थर दिला जातो. पण दुसऱ्या महायुद्धानंतर धातूंची कमतरता भासू लागली होती. त्यामुळे ही ट्रॉफी प्लॅस्टरमध्ये तयार करण्यास सुरुवात करण्यात आली. या ट्रॉफीची किंमत ४०० डॉलर इतकी आहे. भारतीय चलनानुसार जवळपास ३० हजार रुपये.

विभाग