oscar 2023 live updates : चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा सध्या लॉस एंजलिसमध्ये सुरू आहे. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारतीय चित्रपटांनी मोहोर उठवली आहे. आरआरआर सिनेमातील नाटूनाटू या गाण्यानं ऑस्कर पुरस्कार जिंकला आहे. अन्य कोणत्या चित्रपटांनी, कोणत्या विभागात बाजी मारली आहे. जाणून घ्या ९५व्या ऑस्कर सोहळ्याचे लाइव्ह अपडेटस
ऑस्कर सोहळ्याचे लाइव्ह अपडेट
ऑस्कर सोहळ्यातील व्हिडीओ शेअर करत आनंद महिंद्रांनी केलं दीपिकाचं कौतुक
नरेंद्र मोदी यांनी नाटू नाटू आणि 'द एलिफंट व्हिस्पर्स' या चित्रपटाबद्दल पोस्ट करत केले कौतुक.
'नाटू नाटू' गाण्याला 'ऑस्कर' मिळाल्यानंतर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी झाली भावूक. पोस्ट शेअर करत आरआरआरच्या टीमचे केले कौतुक..
'Everything Everywhere All At Once' या चित्रपटाने जिंकला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार
अभिनेत्री मिशेल योहने जिंकला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मान
सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार ब्रेंडन फ्रेझरला मिळाला आहे.
'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन हा पुरस्कार मिळाला आहे.
'Everything Everywhere All At Once'या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग हा पुरस्कार मिळाला आहे.
RRR या चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याला सर्वोत्कृष्ट ओरीजनल सॉंग हा पुरस्कार मिळाला आहे.
'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स' या चित्रपटासाठी डॅनियल क्वान आणि डॅनियल शिनर्ट यांना बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्ले या श्रेणीतील पुरस्कार मिळाला आहे.
अवतार या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट व्हिजुअल इफेक्ट हा पुरस्कार मिळाला आहे.
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म हा ऑस्कर 'द बॉय, द मोल, द फॉक्स अँड द हॉर्स'ला मिळाला आहे.
'The Elephant Whisperers'ला सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंट्री शॉर्ट फिल्म हा ऑस्कर मिळाला आहे. ही भारतीय शॉर्ट फिल्म आहे.
'ऑल क्वाईट ऑन दी वेस्टर्न फ्रंट'ला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला आहे.
रुथ इ कार्टेरला यंदा सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार हा ऑस्कर मिळाला आहे.
द आयरीश गुडबाय या शॉर्ट फिल्मला सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन फिल्म पुरस्कार मिळाला आहे
'ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट' या चित्रपटासाठी जेम्स फ्रेंडला सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी हा पुरस्कार मिळाला आहे.
सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म हा पुरस्कार 'आयरिश गुडबाय' या शॉर्ट फ्लिमला मिळाला आहे.
नवलनी ही सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंट्री फिल्म ठरली आहे.
अभिनेत्री जेमी ली कर्टिस सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी ऑस्कर मिळाला आहे.
ऑस्कर २०२३च्या पुरस्कार सोहळ्यात दीपिका पादूकोण परिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिचा रेड कार्पेट लूक सध्या चर्चेत आहे.
९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या सुरुवातीला आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू गाण्याची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळाली. पुरस्कार सोहळ्याचा सूत्रसंचालक जीमीने नाटू नाटूवर मोनोलॉग सादर केला आहे.
संबंधित बातम्या