मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Vikram Vedha: हैवान बनून पडद्यावर अवतरला हृतिक रोशन; लूक पाहून चाहतेही गपगार

Vikram Vedha: हैवान बनून पडद्यावर अवतरला हृतिक रोशन; लूक पाहून चाहतेही गपगार

Payal Shekhar Naik HT Marathi

Aug 24, 2022, 02:23 PM IST

• Vikram Vedha Release Date: हृतिक रोशन आणि सैफ अली खान स्टारर 'विक्रम वेधा'चा टीझर बुधवारी प्रदर्शित झाला. आता हृतिकच्या लूकला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.
विक्रम वेधा

Vikram Vedha Release Date: हृतिक रोशन आणि सैफ अली खान स्टारर 'विक्रम वेधा'चा टीझर बुधवारी प्रदर्शित झाला. आता हृतिकच्या लूकला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

• Vikram Vedha Release Date: हृतिक रोशन आणि सैफ अली खान स्टारर 'विक्रम वेधा'चा टीझर बुधवारी प्रदर्शित झाला. आता हृतिकच्या लूकला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांच्या 'विक्रम वेधा' या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. पुष्कर आणि गायत्री दिग्दर्शित या चित्रपटाची चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत आणि या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता अनेक पटींनी वाढवली आहे. सैफ आणि हृतिक दोघेही कथेत नकारात्मक भूमिका करत आहेत पण हृतिक रोशनचा लूक जास्त भीतीदायक आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रोमान्स ते क्राईम; आठवडाभर ओटीटीवर असणार धुमाकूळ! पाहा काय काय होतंय रिलीज

अंतराची अंगठी घेण्यासाठी अभिराम लीला शोधून काढणार? ‘नवरी मिळे हिटलर’ला मालिकेत येणार नवा ट्वीस्ट

प्रियाचा चोंबडेपणा सायलीला पडणार भारी! द्यावी लागणार प्रेमाची परीक्षा; ‘ठरलं तर मग’मध्ये येणार वळण!

परदेशवारी करणाऱ्या मुक्ता बर्वेला येतेय मायदेशाची आठवण! पोस्ट लिहित म्हणाली, ‘मी आत्ता भारतात नाहीये…’

हृतिक रोशन

हृतिक रोशन

टीझरमध्ये हृतिक रोशनची पहिली झलक

टीझरची सुरुवात एका सीनने होते ज्यात सैफ आणि हृतिक एका चौकशीच्या खोलीत बसून बोलत असल्याचे दाखवले आहे. दोघेही एकमेकांसमोर बसलेले आहेत आणि इथेच टिझरमधून हृतिकची पहिली झलक पाहायला मिळते. वाढलेली दाढी आणि लांब केस यामुळे हृतिक जास्त धोकादायक दिसतोय.

hrithik roshan

डोक्यावर बंदूक पण चेहऱ्यावर गुढ हसू

हृतिकचा आणखी एक किलर लूक टीझरमध्ये दिसत आहे ज्यामध्ये सैफ हृतिकला एका कारखान्यासारख्या ठिकाणी बंदुकीच्या जोरावर घेऊन जातो. हृतिकच्या कपाळावर बंदूक आहे आणि तो सैफकडे पाहून खूप गुढ हसत आहे. हृतिकच्या मोठ्या डोळ्यांमध्ये क्रूरता स्पष्टपणे दिसून येते.

hrithik roshan

हृतिक रोशन

डोक्यातून रक्त पण चेहऱ्यावर स्वॅग

टीझर व्हिडीओमध्ये हृतिकचा तिसरा डेडली लूक दिसतो, जेव्हा तो एका गर्दीच्या ठिकाणी उभा असताना दिसतो. त्यांच्या पाठीमागे मोठा जमाव आहे आणि हातात काठी घेऊन ऋतिक स्वॅगमध्ये काळा चष्मा घालून निघून जातो. त्याच्या डोक्यातून वाहणारे रक्त हे लूक आणखी खास बनवतं. त्याचप्रमाणे, टीझरमध्ये असे अनेक क्षण आहेत जेव्हा पडद्यावर हृतिकच्या डोळ्यात क्रूरता दिसते. हृतिक नकारात्मक भूमिकेत इतका भयानक दिसण्याची कदाचित ही पहिलीच वेळ आहे.

हृतिक रोशन

विभाग