मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Hritik Roshan: हृतिक रोशन- सबा आझाद लवकरच अडकणार विवाहबंधनात?

Hritik Roshan: हृतिक रोशन- सबा आझाद लवकरच अडकणार विवाहबंधनात?

Payal Shekhar Naik HT Marathi
Jul 19, 2022 04:43 PM IST

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (hrithik roshan)आणि सबा आझाद (saba azad) पहिल्यांदा एका रेस्टोरंन्टमध्ये एकत्र दिसले होते. काही महिन्यांनंतर त्यांनी इंस्टाग्रामवर आपल्या नात्याबद्दल कबुली दिली होती.

हृतिक रोशन आणि सबा आझाद
हृतिक रोशन आणि सबा आझाद

बॉलिवूडचा हॅण्डसम हंक हृतिक रोशन (hrithik roshan tie a knot)सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हृतिक त्याच्या चित्रपटासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. हृतिक आणि सबा आझाद यांचं नातं आता जगजाहीर आहे. मात्र चाहते त्यांच्या लग्नाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. अशातच हृतिक आणि सबा लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती एका वेबसाइटने दिली आहे. हृतिक आणि सबा यांना पहिल्यांदा रेस्टोरंन्टमध्ये एकत्र पाहिलं गेलं होतं. त्यानंतर त्यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्या होत्या. आता ते दोघे लग्नाच्या नात्यात अडकणार असल्याची माहिती आहे.

हृतिकने २००० साली सुझेन खान सोबत लग्न केलं होतं. मात्र २०१४ साली त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. त्यांच्या घटस्फोटाच्या निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर हृतिक गेल्या काही महिन्यांपासून सबाला डेट करत आहे. सबा देखील एक उत्तम अभिनेत्री आहे. त्यांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलंय. एअरपोर्ट असो किंवा आउटिंग सबा आणि ह्रतिक सगळीकडे एकत्र जाताना दिसतात. सध्या ते सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी परदेशी गेले आहेत. अशातच सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. ते दोघे लवकरच लग्न करणार असल्याचं एका वेबसाइटने म्हटलं आहे.

दुसरीकडे सुझेन खान ही देखील अली गोनी याचा भाऊ अर्सलन गोनी याला डेट करत आहे. हृतिक, सबा आणि सुझेन- अर्सलन हे चौघेही गोव्याला एकत्र पार्टी करताना दिसले होते. आता चाहत्यांना हृतिकच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे. येत्या काही महिन्यातच ते दोघे लग्न करणार असल्याची माहिती आहे.

IPL_Entry_Point

विभाग