मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pathaan : ‘५७व्या वर्षी जर तुम्ही २० वर्षांच्या तरुणांना नाचवू शकत असाल तर...’; मराठी अभिनेत्रीची ‘पठाण’साठी खास पोस्ट!

Pathaan : ‘५७व्या वर्षी जर तुम्ही २० वर्षांच्या तरुणांना नाचवू शकत असाल तर...’; मराठी अभिनेत्रीची ‘पठाण’साठी खास पोस्ट!

Jan 30, 2023, 11:21 AM IST

    • Hemangi Kavi post on Pathaan : अभिनेत्री हेमांगी कवी हे शाहरुख खानची चाहती आहे. अनेकदा ती शाहरुखसाठी पोस्ट शेअर करत असते. आता देखील तिने एक अशीच पोस्ट शेअर केली आहे.
Hemangi Kavi post on Pathaan

Hemangi Kavi post on Pathaan : अभिनेत्री हेमांगी कवी हे शाहरुख खानची चाहती आहे. अनेकदा ती शाहरुखसाठी पोस्ट शेअर करत असते. आता देखील तिने एक अशीच पोस्ट शेअर केली आहे.

    • Hemangi Kavi post on Pathaan : अभिनेत्री हेमांगी कवी हे शाहरुख खानची चाहती आहे. अनेकदा ती शाहरुखसाठी पोस्ट शेअर करत असते. आता देखील तिने एक अशीच पोस्ट शेअर केली आहे.

Hemangi Kavi post on Pathaan : शाहरुख खानच्या ‘पठाण’ने सगळ्यांनाच अक्षरशः वेड लावले आहे. या चित्रपटाची जादू सगळ्यांवरच पसरली आहे. चाहतेच नव्हे, तर आता कलाकार देखील ‘पठाण’चे तोंडभरून कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर देखील शाहरुख खानचे कौतुक सुरू आहे. यातच आता मराठी अभिनेत्री हेमांगी कवी हिने शाहरुख खानसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Director Sangeeth Sivan: 'क्या कूल है हम' चित्रपटाचे दिग्दर्शक संगीत सिवन यांचे निधन

गौतमी पाटीलचं नशीब चमकलं! ‘द महाराष्ट्र फाइल्स’ सिनेमातील हिंदी गाण्यावर थिरकरणार

राहुलचा डाव अपयशी, कलाने शोधून काढले नैनाला! 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत वेगळे वळण

अभिरामला तयार करण्यासाठी लीला दुर्गाची मदत घेणार! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये आज काय घडणार?

अभिनेत्री हेमांगी कवी हे शाहरुख खानची चाहती आहे. अनेकदा ती शाहरुखसाठी पोस्ट शेअर करत असते. आता देखील तिने एक अशीच पोस्ट शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये हेमांगी म्हणते की, ‘तो कसा दिसतो, त्याचा धर्म काय, कसा बोलतो, अभिनेता म्हणावं का याला वगैरे वगैरे बोलणाऱ्यांनो तुम्ही आता खरंच बंद पडा! अनेक वर्षांपासून ही चर्चा होत आलीए पण आता ती थांबवुया.. काय? त्याच्या धर्मामुळे, त्याच्या नॉन कन्व्हेंशनल लूकमुळे त्याचा पराकोटीचा द्वेष करणारे आपण सगळ्यांनीच पाहीले आहेत. मी त्याची फॅन आहे कळल्यावर अनेक जणांनी मला अनफॉलो केलं. याहून बालिश प्रकार मी पाहीला नाही. असो.’

पुढे हेमांगी लिहिते की, ‘मला वाटतं या द्वेषाचं मुळ कारण हे लोक अनाहुतपणे स्वतःहाला त्याच्याशी कम्पेअर करत असावेत. हा सगळ्या बाबतीत आपल्यापेक्षा डावा असून ही इतका यशस्वी कसा? आणि आता तर या वयातही!!! सिनेमा प्रदर्शनासाठी लागणारे सगळे ठोकताळे बाजूला सारून घरबसल्या घरी बसणाऱ्या लोकांना थिएटरमध्ये आणणे हे हाच करू जाणे! स्वतःहाच्या मुलाच्या बाबतीत त्याने दाखवलेला संयम (भल्या भल्यांनाही जमला नसता) त्याला या वयात जरा जास्तच आकर्षक बनवतो. उफ्फ अपन तो पहलेसे लुटे हुए थे, अब तो पुरे बरबाद हो गए!’

‘पन्नाशीनंतर रिटायरमेंटचे प्लॅन्सकरून मोकळे झालेल्यांनो द्वेष करण्यापेक्षा त्याच्याकडून काहीतरी शिकूया! तुमच्या ५७ व्या वर्षी जर तुम्ही २०-२२ वयाच्या मुला-मुलींना नाचवू शकत असाल, वेड लावू शकत असाल तर पुढे बोला! बाकी…झूमे जो पठान मेरी जान, महफ़िल ही लूट जाए!’, असं म्हणत तिने ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे.