मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pathaan Collection : जगभरात केवळ ‘पठाण’ची हवा! कलेक्शनचे आकडे जाणून व्हाल थक्क!

Pathaan Collection : जगभरात केवळ ‘पठाण’ची हवा! कलेक्शनचे आकडे जाणून व्हाल थक्क!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 30, 2023 08:58 AM IST

Pathaan Worldwide Box Office Collection: एका दिवसांत तब्बल १०० ते १२० कोटींची कमाई! ‘पठाण’चं एकूण कलेक्शन पाहिलंत का?

Pathaan
Pathaan

Pathaan Worldwide Box Office Collection: तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानची जादू पाहायला मिळत आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. रिलीजच्या अवघ्या ५ व्या दिवशी या चित्रपटाने तब्बल ५०० कोटींचा टप्पा गाठला आहे. ‘पठाण’ हा चित्रपट २५ जानेवारीला थिएटरमध्ये रिलीज झाला असला, तरी वीकेंडला त्याचा सर्वात मोठा फायदा झाला. रविवारी या चित्रपटाने आतापर्यंतची सर्वाधिक कमाई केली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार रविवारी भारतीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने सुमारे ६५ ते ७० कोटींची कमाई केली आहे. तर, जगभरात आकडा १२५ ते १३० कोटी रुपये इतका असल्याचे सांगण्यात येत आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, शनिवारपर्यंत या चित्रपटाचे वर्ल्डवाईड कलेक्शन ४२९ कोटींवर गेले होते. तर, आता रविवारचे आकडे लक्षात घेता शाहरुख खानच्या या चित्रपटाने ५०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

नुकत्याच रिलीज झालेल्या ‘पठाण’ या चित्रपटाने आता जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी ‘पठाण’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशाचा झेंडा रोवला आहे. ‘पठाण’ या चित्रपटातून शाहरुख खान याने ४ वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. चार वर्षांच्या ब्रेकनंतरही शाहरुखची जादू तसूभरही कमी झालेली नाही.

‘पठाण’ चित्रपटातून शाहरुखने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. तर, अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या ग्लॅमरस स्टाईलनेही धुमाकूळ घातला आहे. जॉन अब्राहम देखील खलनायकाच्या भूमिकेत हिट ठरल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर सलमान खानच्या कॅमिओनेही या चित्रपटाला चार चाँद लावले आहेत.

WhatsApp channel