मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ashwini Bhave Birthday: मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवणाऱ्या अश्विनी भावे; वाचा अभिनेत्रीबद्दल…

Ashwini Bhave Birthday: मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवणाऱ्या अश्विनी भावे; वाचा अभिनेत्रीबद्दल…

May 07, 2023, 07:34 AM IST

  • Happy Birthday Ashwini Bhave: अभिनेत्री अश्विनी भावे यांच्या निखळ सौंदर्याने चाहत्यांना नेहमीच मोहित केलं. मराठीच नाही तर, हिंदी आणि कन्नड मनोरंजन विश्वातही त्यांनी आपल्या दमदार अभिनयाचा जलवा दाखवला.

Ashwini Bhave

Happy Birthday Ashwini Bhave: अभिनेत्री अश्विनी भावे यांच्या निखळ सौंदर्याने चाहत्यांना नेहमीच मोहित केलं. मराठीच नाही तर, हिंदी आणि कन्नड मनोरंजन विश्वातही त्यांनी आपल्या दमदार अभिनयाचा जलवा दाखवला.

  • Happy Birthday Ashwini Bhave: अभिनेत्री अश्विनी भावे यांच्या निखळ सौंदर्याने चाहत्यांना नेहमीच मोहित केलं. मराठीच नाही तर, हिंदी आणि कन्नड मनोरंजन विश्वातही त्यांनी आपल्या दमदार अभिनयाचा जलवा दाखवला.

Happy Birthday Ashwini Bhave: मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टी देखील गाजवली. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री अश्विनी भावे. ‘अशीही बनवा बनवी’ या आयकॉनिक मराठी चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या चित्रपटात त्यांनी परिधान केलेली लिंबू कलरची साडी तुफान गाजली. आज (७ मे) अभिनेत्री अश्विनी भावे आपला वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी...

ट्रेंडिंग न्यूज

महेश कोठारेंची कमाल! मोठ्या पडद्यावर पुन्हा दिसणार इन्स्पेक्टर महेश आणि लक्ष्याची धमाल! कशी? वाचाच...

निलेश साबळेच्या ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’मध्ये श्रेया, कुशल आणि भारत का नाहीत? अभिनेत्याने थेट दिले उत्तर!

ये राम तो रॅम्बो निकला रे! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये अभिरामचा डॅशिंग अंदाज पाहून लीलाही हैराण!

तयार राहा... ‘बाहुबली’ पुन्हा येतोय! एसएस राजमौलींनी प्रेक्षकांना दिलं तगडं सरप्राईज! नव्या प्रोजेक्टची घोषणा

अभिनेत्री अश्विनी भावे यांच्या निखळ सौंदर्याने चाहत्यांना नेहमीच मोहित केलं. मराठीच नाही तर, हिंदी आणि कन्नड मनोरंजन विश्वातही त्यांनी आपल्या दमदार अभिनयाचा जलवा दाखवला. अश्विनी भावे यांचा जन्म ७ मे १९७२ रोजी मुंबईत झाला. मुंबईतील साधना विद्यालय आणि रुपारेल कॉलेज मधून त्यांनी आपले पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को येथून फिल्म संबंधित विषयात पदविका देखील मिळवली. शिक्षणात हुशार विद्यार्थिनी असलेल्या अश्विनी भावे यांना सुरुवातीपासूनच मनोरंजन विश्व खुणावत होते.

Viral Video : हिंदू दाम्पत्याने मशिदीत बांधली लग्नगाठ; व्हिडीओ शेअर करत एआर रहमाननं केलं कौतुक!

कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी मराठी नाटकांमधून काम करण्यास सुरुवात केली. हळूहळू त्यांनी छोट्या पडद्याच्या दिशेने आपला मोर्चा वळवला.‘अंतरिक्ष’ नावाच्या विज्ञान विषयक मालिकेमधून त्यांनी टीव्ही विश्वात पदार्पण केले होते. यानंतर त्यांनी‘युगपुरुष’ या गाजलेल्या मालिकेत देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. या मालिकेनंतर मात्र त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. यामालिकेनंतर त्यांच्याकडे बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या होत्या. यानंतर त्यांची पावलं मोठ्या पडद्याच्या दिशेनी वळली.

‘शाबास सुनबाई’,‘वजीर’, ‘अशीही बनवाबनवी’ अशा चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या. ‘अशीही बनवा बनवी’ या चित्रपटाने त्यांच्या करिअरला कलाटणी दिली. या चित्रपटानंतर त्यांच्याकडे बॉलिवूड चित्रपटाच्या ऑफर येऊ लागल्या होत्या. अखेर त्यांनी‘हिना’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली.‘हिना’ हा चित्रपट त्याकाळी सर्वात गाजलेल्या चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटातील‘देर ना हो जाए कही देर ना हो जाए’ हे गाणे अश्विनी भावे यांच्यावर चित्रित केले गेले होते, जे आजही अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये आहे. कारकीर्द यशाच्या शिखरावर असतानाच त्यांनी लग्न करून परदेशी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. मात्र, आजही त्या अनेक कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावतात.

विभाग