मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video : हिंदू दाम्पत्याने मशिदीत बांधली लग्नगाठ; व्हिडीओ शेअर करत एआर रहमाननं केलं कौतुक!

Viral Video : हिंदू दाम्पत्याने मशिदीत बांधली लग्नगाठ; व्हिडीओ शेअर करत एआर रहमाननं केलं कौतुक!

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 06, 2023 03:05 PM IST

AR Rahman shared viral video : ऑस्कर-विजेता गायक एआर रहमानने त्याच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक हिंदू जोडपे मशिदीत लग्न विधी करताना दिसत आहेत.

AR Rahman shared viral video
AR Rahman shared viral video

AR Rahman shared viral video : 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. मात्र, हा चित्रपट रिलीज होण्याआधीच अनेक वादात अडकला आहे. या चित्रपटामागे लागलेला वादाचा ससेमिरा अद्याप थांबण्याचे नाव घेत नाहीये. या चित्रपटावर आक्षेप घेत अनेक राजकीय पक्षांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. मात्र, या सगळ्या वादादरम्यान आता ऑस्कर-विजेता गायक एआर रहमानने त्याच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक हिंदू जोडपे मशिदीत लग्न विधी करताना दिसत आहेत.

एआर रहमान याने शेअर केलेला हा व्हिडीओ खूप जुना आहे. मात्र, एआर रहमान याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्याने तो पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. त्याचबरोबर 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाचा वाद चिघळल्याने तो आणखी चर्चेत आला आहे. एआर रहमान यांनी हा व्हिडीओ शेअर करत या जोडप्याचे कौतुक केले आहे.

Pathaan: शाहरुख खानच्या चित्रपटाचा नवा विक्रम! ‘पठान’ पुन्हा रिलीज होणार? जाणून घ्या...

गायक-संगीतकार एआर रहमानने शेअर केलेला हा व्हिडीओ २०२२मधील आहे. मशिदीत लग्न करणाऱ्या या जोडप्याचे नाव अंजू आणि शरठ आहे. अंजूच्या आईची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यानंतर तिने लग्नासाठी मशिद समितीकडे मदत मागितली आणि समितीनेही तिला मदत करण्याचे मान्य केले. मशिद समितीनेच या विवाहाची संपूर्ण तयारी केली असून, हा विवाह हिंदू रितीरिवाजांनुसार पार पडला. या लग्नात सुमारे १००० लोकांची व्यवस्था करण्यात आली होती. इतकेच नाही तर, केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनीही फेसबुकवर या जोडप्याचे कौतुक केले होते.

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या वादादरम्यान आता एआर रहमान यांनी हा व्हिडीओ शेअर केल्याने तो चर्चेत आला आहे. दिग्दर्शक सुदीप्तो सेन दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' या चित्रपटात ३ महिलांची कथा दाखवण्यात आली आहे, ज्यांचे ब्रेनवॉश करून इस्लामिक धर्म स्वीकारायला लावला जातो. यानंतर त्यांचा ISIS या दहशतवादी संघटनेत समावेश होतो. ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला होता. अभिनेत्री अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

IPL_Entry_Point

विभाग