मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Vindu Dara Singh Birthday : ‘हनुमान’ही विंदू दारा सिंहचं करिअर वाचवू शकले नाही! वाचा अभिनेत्याबद्दल...

Vindu Dara Singh Birthday : ‘हनुमान’ही विंदू दारा सिंहचं करिअर वाचवू शकले नाही! वाचा अभिनेत्याबद्दल...

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 06, 2023 07:34 AM IST

Happy Birthday Vindu Dara Singh: अभिनेता विंदू दारा सिंह याने वडिलांच्या अर्थात दारा सिंह यांच्या पावलावर पाऊल ठेवत आधी टीव्ही मालिकांमध्ये आणि नंतर चित्रपटांमध्येही आपले नशीब आजमावले.

Vindu Dara Singh
Vindu Dara Singh

Happy Birthday Vindu Dara Singh: बॉलिवूडच्या बहुचर्चित चेहऱ्यांपैकी एक असलेल्या अभिनेता विंदू दारा सिंह याचा आज (६ मे) ५९वा वाढदिवस आहे. विंदू दारा सिंहची चित्रपट कारकीर्द फारशी चर्चेत नसली तरी, त्याचे नाव अनेक वादांमध्ये अडकले होते. या वादांमुळे तो नेहमीच चर्चेत राहिला आहे. अभिनेता विंदू दारा सिंह याने वडिलांच्या अर्थात दारा सिंह यांच्या पावलावर पाऊल ठेवत आधी टीव्ही मालिकांमध्ये आणि नंतर चित्रपटांमध्येही आपले नशीब आजमावले. परंतु, विंदूला त्याच्या वडिलांप्रमाणे लोकप्रियता मिळवता आली नाही.

बॉलिवूड अभिनेता विंदू दारा सिंह जवळपास गेली २० वर्ष फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहे. अनेक सहाय्यक भूमिकांमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. याशिवाय त्याचे नाव अनेक वादांशीही जोडले गेले होते. विंदू दारा सिंहने १९९४मध्ये प्रदर्शित झालेल्या 'करण' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. यानंतर त्याने १९९६मध्ये ‘रब दिया रखा’ या पंजाबी चित्रपटातही काम केले. केवळ बॉलिवूडच नव्हे, तर विंदूने पंजाबी चित्रपटांमध्येही आपले नशीब आजमावले. सलमान खानसोबत अनेक चित्रपटांमध्येतो सहाय्यक भूमिका साकारताना दिसला आहे. 'गर्व', 'मैने प्यार क्यूं किया', 'पार्टनर' या सलमानच्या चित्रपटांमध्ये विंदूने काम केले आहे.

Aai Kuthe Kay Karte: लग्न करताना ईशा आणि अनिशची पत्रिका पाहण्यावर मत भेद, मालिकेत रंजन वळण

विंदू दर सिंहने आपल्या चित्रपट कारकिर्दीत 'किससे प्यार करूं', 'कम्बख्त इश्क', 'मारुती', 'मुझसे शादी करोगी' आणि 'हाऊसफुल' या सर्हे चित्रपटही केले. मात्र, तरीही त्याला फारशी प्रसिद्धी मिळू शकली नाही. चित्रपटांव्यतिरिक्त विंदू दारा सिंहने छोट्या पडद्यावरही आपले नशीब आजमावले. विंदूच्या वडिलांनी म्हणजेच अभिनेते दारा सिंह यांच्या प्रमाणेच अभिनेत्यानेही ‘हनुमाना’ची भूमिका साकारली होती. 'जय वीर हनुमान' या मालिकेत विंदूने हनुमानाची भूमिका साकारली होती. मात्र, या भूमिकेतूनही त्याला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही.

मात्र, ‘बिग बॉस’ या शोमध्ये विंदूचे नशीब चमकले. २००९मध्ये विंदू दारा सिंह 'बिग बॉस सीझन ३'चा विजेता ठरला. 'बिग बॉस' जिंकल्यानंतर, अभिनेत्याचे करिअर पुन्हा रुळावर येईल असे सगळ्यांनाच वाटत होते. मात्र, त्याच्या पदरी केवळ निराशाच पडली. २०१३ मध्ये विंदू दारा सिंहचे नाव आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये आले होते. त्यावेळी विंदूला पोलिसांनी अटक देखील केली होती. त्यानंतर स्थानिक न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. दोन लग्न केल्यामुळे देखील अभिनेता नेहमीच चर्चेत राहिला होता.

IPL_Entry_Point

विभाग