मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rang Maza Vegla : अखेर दीपाला कळणार कार्तिकचं सत्य; ‘रंग माझा वेगळा’मध्ये येणार धक्कादायक वळण!

Rang Maza Vegla : अखेर दीपाला कळणार कार्तिकचं सत्य; ‘रंग माझा वेगळा’मध्ये येणार धक्कादायक वळण!

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 06, 2023 12:07 PM IST

Rang Maza Vegla Latest Episode: दीपा कार्तिक बंद असलेल्या तुरुंगात जाणार आहे. यावेळी त्या कोठडीतील दृश्य बघून दीपाच्या पायाखालची जमीन सरकरणार आहे.

Rang Maza Vegla
Rang Maza Vegla

Rang Maza Vegla Latest Episode:रंग माझा वेगळा’ मालिकेमध्ये आता मोठे धक्कादायक वळण येणार आहे. अखेर आता दीपाला कार्तिकचं सत्य कळणार आहे. १४ वर्ष शिक्षा भोगून आलेला कार्तिक बाहेर येऊन केवळ दिखाव्याचं प्रेम करतोय, हे दीपाच्या समोर येणार आहे. कार्तिकचं खरं रूप समोर आल्यानंतर आता दीपाला मोठा धक्का बसणार आहे. तुरुंगातून सुटल्यापासून कार्तिक काहीतरी विचित्र वागतोय याचा अंदाज दीपाला आलाच होता. मात्र, तिने हा केवळ भ्रम असावा, अशी मनाची समजूत घातली होती. मात्र, आता तिचा हा भ्रमाचा भोपळा फुटणार आहे.

दीपा कार्तिक बंद असलेल्या तुरुंगात जाणार आहे. यावेळी त्या कोठडीतील दृश्य बघून दीपाच्या पायाखालची जमीन सरकरणार आहे. या कोठडीच्या भिंतीवर कार्तिकने दीपाचं नाव लिहून त्यावर फुल्या मारल्या आहेत. याचाचा अर्थ कार्तिक दीपाचा प्रचंड तिरस्कार करत आहे. मात्र, तो सगळ्यांसमोर चांगलं वागण्याचं नाटक करत आहे. हे आता दीपाच्या समोर उघड होणार आहे. यानंतर आता दीपा आपल्या आयुष्याचा निर्णय काय घेणार, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.

Adipurush Trailer: एक-दोन नव्हे, तब्बल ७० देशांत ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘आदिपुरुष’चा ट्रेलर!

कार्तिक तुरुंगातून आल्यापासून त्याच्या स्वभावात झालेला बदल दीपाने बरोबर ओळखला आहे. तिने वेळोवेळी हा बदल सौंदर्याच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्नही केला. मात्र, सौंदर्या इनामदार हिने नेहमीच कार्तिकची बाजू घेतली. कार्तिक १४ वर्ष तुरुंगात होता. त्यामुळे कदाचित त्याला या वातावरणाची सवय राहिली नसेल. त्याला थोडा वेळ देऊया, असं सौंदर्या इनामदार म्हणते. मात्र, दीपा नेहमीच कार्तिकपासून सावध राहण्याचा प्रयत्न करत आहे. याचाच फायदा घेऊन आता कार्तिक दीपा विरोधात नवा डाव रचत आहे.

दुसरीकडे आयेशा आता नवा डाव रचत आहे. साक्षीच्या मृत्यूला जबाबदार असलेलं चुकीचं इंजेक्शन हे आयेशानेच बदललं होतं. आयेशाचं हे सत्य केवळ तिच्या कुटुंबाला आणि घाडगे वकिलाला माहित आहे. कार्तिक आणि दीपा इनामदार यांच्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी घाडगे वकिलाने आता आयेशा आणि तिच्या कुटुंबाला हाताशी धरलं आहे. एकाच दगडात दोन पक्षी मारता यावेत असा डाव त्याने आखला आहे. एकीकडे त्याने आयेशाला एका गुन्हातून बाहेर काढून तिच्या कुटुंबाला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आहे.

WhatsApp channel