मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gautami Patil: गौतमी पाटीलच्या पहिल्या मराठी चित्रपटाचा टीझर पाहिलात का?

Gautami Patil: गौतमी पाटीलच्या पहिल्या मराठी चित्रपटाचा टीझर पाहिलात का?

Aarti Vilas Borade HT Marathi

Apr 10, 2023, 04:49 PM IST

    • Gautami Patil Movie: गौतमी पाटीलच्या ‘घुंगरु’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून चर्चेत आहे.
Gautami Patil

Gautami Patil Movie: गौतमी पाटीलच्या ‘घुंगरु’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून चर्चेत आहे.

    • Gautami Patil Movie: गौतमी पाटीलच्या ‘घुंगरु’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून चर्चेत आहे.

आपल्या लावणीने आणि सौंदर्याने सगळ्यांना घायाळ करणारी गौतमी पाटील नेहमीच चर्चेत असते. तिने महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी लावणी करत प्रेक्षकांना वेड लावले आहे. अनेक खेड्यापाड्यात तिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते आणि या कार्यक्रमांना तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळते. लवकरच गौतमी एका चित्रपटात दिसणार आहे. आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये खुलतय प्रेम, काय असेल सावनीचा नवा डाव? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार वाचा

Ajinkya Deo Birthday: अभिनेते अजिंक्य देव यांचा पहिला हॉलिवूड सिनेमा माहिती आहे का? जाणून घ्या त्यांच्याविषयी

'हिच्या पेक्षा तर उर्फी बरी...', करण कुंद्राची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश कपड्यांमुळे झाली ट्रोल

‘द कपिल शर्मा शो’ दोन महिन्यातच होणार बंद? अर्चना पूरण सिंहने चाहत्यांना दिला झटका

गौतमी पाटील लवकरच 'घुंगरु' या मराठी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती लावणी कलावंताची भूमिका साकारणार आहे. तसेच तिच्या आयुष्यात येणाऱ्या अघटित घटनांमुळे नायकाच्या ती प्रेमात पडते. यात राजकारण, थरारदृश्य देखील पाहायला मिळणार आहेत. चित्रपटातील गौतमी पाटीलचा डान्स व कातीला अदा पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: नवरा कसा हवा?; गौतमी पाटील म्हणाली "मला पैसे, बंगला, प्रतिष्ठा..."

घुंगरु या चित्रपटाची निर्मिती चिंतामणी सिने क्रिएशन्स प्रस्तुत बाबा गायकवाड आणि अजित केंद्रे यांनी केली आहे. तर संदीप डांगे यांनी दिग्दर्शन केले आहे. गौतमीसोबत चित्रपटात काही नवीन कलाकार दिसणार आहेत. तसेच अभिनेत्री उषा चव्हाण महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या सोशल मीडियावर गौतमीच्या या चित्रपटाचा टीझर चर्चेत आहे.

गौतमीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिची लावणी संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय ठरत आहे. नुकताच तिचे तेरा पता हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. आता ती 'घुंगरू' या मराठी चित्रपटात दिसणार आहे. सर्वजण तिच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

विभाग