मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gautami Patil: नवरा कसा हवा?; गौतमी पाटील म्हणाली "मला पैसे, बंगला, प्रतिष्ठा..."

Gautami Patil: नवरा कसा हवा?; गौतमी पाटील म्हणाली "मला पैसे, बंगला, प्रतिष्ठा..."

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 09, 2023 11:40 AM IST

Gautami Patil: गौतमी पाटीलने नुकताच एका यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला खासगी प्रश्न विचारण्यात आले होते.

Gautami Patil Lavni Dance
Gautami Patil Lavni Dance (HT)

आपल्या लावणीने आणि सौंदर्याने सगळ्यांना घायाळ करणारी गौतमी पाटील नेहमीच चर्चेत असते. तिने महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी लावणी करत प्रेक्षकांना वेड लावले आहे. अनेक खेड्यापाड्यात तिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते आणि या कार्यक्रमांना तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळते. गौतमी पाटीलकडून अश्लील नृत्य होत असल्याचा आरोप वारंवार होत आहे. नुकताच गौतमीने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ती पहिल्यांदाच लग्नाविषयी बोलली आहे.

गौतमीने एका यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. "माझे शालेय शिक्षण मुलींच्या शाळेत झाले. बाबाचे लवकर निधन झाले. त्यानंतर घरी कोणीच पुरुष नव्हता. ना वडील ना भाऊ, ना नातेवाईक. माझा कधीच कोणत्या पुरुषासोबत वैयक्तिक संबंध आलेला नाही. त्यामुळे घरातल्या जबाबदाऱ्यांचा अर्धा वाटा उचलण्यासाठी तरी एक पुरुष आयुष्यात असायला हवा, अशी माझी इच्छा आहे. याच कारणाने मला लग्न करायचे आहे" असे गौतमी म्हणाली.
वाचा: 'तुला पाहते रे २' येणार प्रेक्षकांच्या भेटीला? गायत्री दातारने मौन

पुढे तिला नवरा कसा हवा आहे याबाबत बोलतना ती म्हणाली, "मला पैसे, बंगला, प्रतिष्ठा यापैकी कशाचीही गरज नाही. पण येईल त्या परिस्थितीत माझी साथ देणारा जोडीदार मला हवा आहे. जेव्हा असा मुलगा मिळेल तेव्हाच मी लग्नाचा विचार करेन. आता मी २५ वर्षांची असून माझे लग्न झालेले नाही. पण लवकरच लग्नबंधनात अडकण्याची माझी इच्छा आहे."

याआधी गौतमीने अनेकदा कुटुंबाविषयी सांगितले आहे. तिचे आई-वडील यावर तिने अनेकदा वक्तव्य केले आहे. मात्र यावेळी पहिल्यांदाच ती लग्नाविषयी उघडपणे बोलली आहे. याआधी तिने याविषयावर बोलणे टाळले होते.

गौतमीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिची लावणी संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय ठरत आहे. नुकताच तिचे तेरा पता हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. आता ती 'घुंगरू' या मराठी चित्रपटात दिसणार आहे. सर्वजण तिच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

IPL_Entry_Point

विभाग