मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Dagadi Chawl 2: खुशखबर! दगडी चाळ २ पाहायला मिळणार 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर

Dagadi Chawl 2: खुशखबर! दगडी चाळ २ पाहायला मिळणार 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर

Aarti Vilas Borade HT Marathi

Sep 15, 2022, 04:28 PM IST

    • 'शंभो' म्हणत आख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या मकरंद देशपांडे यांचा कमाल अभिनय, सूर्याची भूमिका साकारणारा चॉकलेट बॉय अंकुश चौधरी तर कलरफुल पूजा सावंतने प्रेक्षकांची मने जिंकली होती.
दगडी चाळ २ (HT)

'शंभो' म्हणत आख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या मकरंद देशपांडे यांचा कमाल अभिनय, सूर्याची भूमिका साकारणारा चॉकलेट बॉय अंकुश चौधरी तर कलरफुल पूजा सावंतने प्रेक्षकांची मने जिंकली होती.

    • 'शंभो' म्हणत आख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या मकरंद देशपांडे यांचा कमाल अभिनय, सूर्याची भूमिका साकारणारा चॉकलेट बॉय अंकुश चौधरी तर कलरफुल पूजा सावंतने प्रेक्षकांची मने जिंकली होती.

चंद्रकांत कणसे दिग्दर्शित 'दगडी चाळ २' या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. २०१५ ला आलेल्या दगडीचाळ नंतर यंदा 'दगडीचाळ २' ने यशाचा झेंडा रोवला. तब्बल ७ वर्ष प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहात झुंबड उडवली होती. प्रत्येक डायलॉगवर शिट्ट्या असो किंवा टाळ्यांचा नाद असो, आख्या महाराष्ट्रात या चित्रपटाने तुफान आणले आहे. आता हाच चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अभिरामचं लग्न मोडण्यामागचं सत्य कुणाला कळू शकेल का? ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत ट्वीस्ट

कुणालच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी चैतन्यसोबत सुभेदार कुटुंबही झालं सज्ज! ‘ठरलं तर मग’मध्ये रोमांचक वळण

भारतीय क्रिकेट टीमसाठी ‘अश्वत्थामा’ बनले अमिताभ बच्चन! सोशल मीडियावरील Viral Video पाहिलात का?

नैना लग्नाला पोहोचणारच नाही असा राहुलने आखला डाव, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत काय घडणार?

दगडी चाळ २ हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर १८ सप्टेंबर पासून प्रदर्शित होणार आहे. चाहत्यांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. तसेच दगडी चाळ हा पहिला चित्रपट देखील अॅमेझॉन प्राइम वर पाहायला मिळणार आहे.
आणखी वाचा : कुणीतरी येणार गं! रंगणार गौरीच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम

मुंबईत पडद्याआड चालणाऱ्या गुन्ह्यांची कथा सांगणारे हे सिक्वेल पुन्हा एकदा कुप्रसिद्ध दगडी चाळीतच घडते. ज्येष्ठ अभिनेते मकरंद देशपांडे व अंकुश चौधरी पुन्हा एकदा अनुक्रमे डॅडी व सूर्याच्या भूमिकांमध्ये आहेत. चाळ पाडल्यानंतर आपली आयुष्ये नव्याने बांधण्याच्या प्रक्रियेतून ते जात आहेत. डॅडींच्या राजकीय महत्त्वाकांक्षा त्यांना पुढे घेऊन जातात, तर सूर्याचा सोनलसोबत (पूजा सावंत) रोमॅण्टिक प्रवास सुरू राहतो. रहस्यात गुंफलेल्या कथेतून थरारक पद्धतीने गुन्हे, हिंसा व समाजातील सत्तासंघर्ष उलगडत जातो.

विभाग