मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ponniyin Selvan: 'पोन्नियिन सेलवन' प्रदर्शनापूर्वी थिएटर मालकाला धमकी

Ponniyin Selvan: 'पोन्नियिन सेलवन' प्रदर्शनापूर्वी थिएटर मालकाला धमकी

Aarti Vilas Borade HT Marathi

Sep 28, 2022, 03:22 PM IST

    • चित्रपटगृहांच्या मालकांना मेलद्वारे धमकी देण्यात आली आहे. 'पोन्नियिन सेलवन' चित्रपटाला स्क्रीन देऊ नका अशी मागणी केली जात आहे.
ऐश्वर्या राय बच्चन (HT)

चित्रपटगृहांच्या मालकांना मेलद्वारे धमकी देण्यात आली आहे. 'पोन्नियिन सेलवन' चित्रपटाला स्क्रीन देऊ नका अशी मागणी केली जात आहे.

    • चित्रपटगृहांच्या मालकांना मेलद्वारे धमकी देण्यात आली आहे. 'पोन्नियिन सेलवन' चित्रपटाला स्क्रीन देऊ नका अशी मागणी केली जात आहे.

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा बहुप्रतिक्षीत चित्रपट म्हणजे 'पोन्नियिन सेलवन.' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा चित्रपट ३० सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अशातच कॅनडा येथील काही चित्रपटगृहाच्या मालकांना ई-मेलद्वारे हा चित्रपट तुमच्या चित्रपटगृहांमध्ये लावू नका अशी धमकी देण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Bharti Singh: ३ दिवस सतत त्रास झाल्यानंतर कॉमेडियन भारती सिंह रुग्णालयात दाखल, होणार सर्जरी

सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये खुलतय प्रेम, काय असेल सावनीचा नवा डाव? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार वाचा

Ajinkya Deo Birthday: अभिनेते अजिंक्य देव यांचा पहिला हॉलिवूड सिनेमा माहिती आहे का? जाणून घ्या त्यांच्याविषयी

'हिच्या पेक्षा तर उर्फी बरी...', करण कुंद्राची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश कपड्यांमुळे झाली ट्रोल

केडब्ल्यू टॉकीजने 'पोन्नियिन सेलवन' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे चित्रपटगृहांच्या मलाकांना येणाऱ्या धमक्यांविषयी सांगितले आहे. 'आमच्याकडे हॅमिल्टन, किचनर आणि लंडनचे अपडेट्स आहेत. सर्व थिएटर मालकांनी पोन्नियिन सेलवन तमिळ किंवा KW टॉकीजचा कोणताही चित्रपट लावू नये अशी धमकी देण्यात आली आहे' या आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे.
वाचा : ए राम्या बजेटमध्ये राहायचं; श्रेयस तळपदेच्या 'आपडी थापडी'चा ट्रेलर प्रदर्शित

पुढे ते म्हणाले, 'त्यांनी पाठवलेल्या मेलमध्ये नमूद केले आहे की जर चित्रपटगृहांच्या मालकांनी पोन्नियिन सेलवन या चित्रपटाला स्क्रीन दिली तर ती फाडून टाकली जाईल. तसेच चित्रपटगृहाच्या परिसरात विषारी पदार्थ पसरवले जातील. केडब्ल्यू टॉकीजद्वारे प्रदर्शित होणाऱ्या प्रत्येक चित्रपटाकडे आमचे लक्ष असणार आहे.'

दरम्यान, दक्षिण भारतीय चित्रपटाला अज्ञात लोकांकडून धमक्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या नोव्हेंबरमध्ये, दुल्कर सलमान स्टारर मल्याळम चित्रपट 'कुरूप' ऑन्टारियोमध्ये प्रदर्शित झाला तेव्हा हल्ला करण्यात आला होता. रिचमंड हिल आणि ओकविले येथील दोन चित्रपटगृहांचे पडदे फाडण्यात आले होते.

पोन्नियिन सेलवन' हा चित्रपट ३० सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिल, कन्नड़ आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील गाण्यांना एआर रहमानने संगीत दिले आहे.

विभाग