मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aapdi Thaapdi: ए राम्या बजेटमध्ये राहायचं; श्रेयस तळपदेच्या 'आपडी थापडी'चा ट्रेलर प्रदर्शित

Aapdi Thaapdi: ए राम्या बजेटमध्ये राहायचं; श्रेयस तळपदेच्या 'आपडी थापडी'चा ट्रेलर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 26, 2022 11:55 AM IST

Shreyas Talpade: ५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

आपडी थापडी ट्रेलर
आपडी थापडी ट्रेलर (HT)

मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे. तो सध्या छोट्या पडद्यावरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत दिसत आहे. आता लवकरच त्याचा "आपडी थापडी" चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री मुक्ता बर्वे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून चर्चेत आहे.

"आपडी थापडी" चित्रपटाच्या २ मिनिटे ३३ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये अतिशय कंजुष स्वभाव असलेला सखाराम पाटील अर्थात श्रेयस तळपदे दाखवण्यात आला आहे. त्याची पत्नी अर्थात मुक्ता बर्वे आणि त्यांची मुलगी असं पाटील कुटुंब या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. असा एक प्रसंग घडतो आणि काय धमाल होते याची गोष्ट चित्रपटात आहे. ट्रेलर तर धमाकेदार आहेच पण आता उत्सुकता आहे की पिंकू नक्की आहे तरी कोण ??
वाचा : श्रेयस तळपदेच्या "बेबीफेस"ची सोशल मीडियावर चर्चा!

'आपडी थापडी' या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद करीर यांचं आहे. सुनीला करीर आणि आनंद करीर यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे यांच्यासह नंदू माधव, संदीप पाठक, नवीन प्रभाकर, खुशी हजारे अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटात आहे. तर सुमन साहू यांनी चित्रपटाचं छायांकन आहे. 'फॅमिलीचा चित्रपट बघा फॅमिली बरोबर' अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटात पाटील कुटुंबाची एक मजेशीर गोष्ट उलगडली आहे. ५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

IPL_Entry_Point