मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kailash Kher: कर्नाटकातील कार्यक्रमादरम्यान गायक कैलाश खेरवर हल्ला; आरोपीला पोलिसांकडून अटक

Kailash Kher: कर्नाटकातील कार्यक्रमादरम्यान गायक कैलाश खेरवर हल्ला; आरोपीला पोलिसांकडून अटक

Jan 30, 2023, 12:35 PM IST

    • Kailash Kher: कर्नाटकमध्ये एका कॉन्सर्टदरम्यान कैलाश खेर यांच्यावर हल्ला झाला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत कैलाश खेर यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.
Kailash Kher

Kailash Kher: कर्नाटकमध्ये एका कॉन्सर्टदरम्यान कैलाश खेर यांच्यावर हल्ला झाला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत कैलाश खेर यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.

    • Kailash Kher: कर्नाटकमध्ये एका कॉन्सर्टदरम्यान कैलाश खेर यांच्यावर हल्ला झाला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत कैलाश खेर यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.

Attack On Kailash Kher : आपल्या आवाजामुळे आणि वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे प्रसिद्ध गायक कैलाश खेर आज वेगळ्याच कारणामुळे प्रसिद्धी झोतात आले आहेत. कर्नाटकमध्ये एका कॉन्सर्टदरम्यान कैलाश खेर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार कर्नाटकात एका कॉन्सर्टदरम्यान गायक कैलाश खेर यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. या कॉन्सर्टदरम्यान कैलाश खेर यांना बाटली फेकून मारण्यात आली होती. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तातडीने कारवाई करत कैलाश खेर यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला अटक केली.

ट्रेंडिंग न्यूज

स्मिता तांबे घडवणार शेतकऱ्यांच्या जगण्याचं दर्शन! शेतकऱ्याची व्यथा सांगणाऱ्या ‘कासरा’चा ट्रेलर पाहिलात का?

रोमान्स ते क्राईम; आठवडाभर ओटीटीवर असणार धुमाकूळ! पाहा काय काय होतंय रिलीज

अंतराची अंगठी घेण्यासाठी अभिराम लीला शोधून काढणार? ‘नवरी मिळे हिटलर’ला मालिकेत येणार नवा ट्वीस्ट

प्रियाचा चोंबडेपणा सायलीला पडणार भारी! द्यावी लागणार प्रेमाची परीक्षा; ‘ठरलं तर मग’मध्ये येणार वळण!

कर्नाटकातील हम्पी शहरात कैलाश खेर यांच्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये प्रचंड गर्दी जमली होती. याच दरम्यान त्यांच्यावर हल्ला झाला. कैलाश खेर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हम्पीतील या कार्यक्रमाची माहिती दिली होती.

हंपीमध्ये सुरू असलेल्या कॉन्सर्टमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर गायक कैलाश खेर यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. कैलाश आणि त्याचा बँड या मैफिलीत सहभागी झाले होते. या हल्ल्यामागचे प्राथमिक कारण देखील समोर आले आहे. या कॉन्सर्टदरम्यान एका व्यक्तीने कैलाश यांच्याकडे कन्नड गाणे गाण्याची वारंवार मागणी केली होती. मात्र, त्याची विनंती कैलाश खेरपर्यंत न पोहोचल्याने सदर व्यक्तीने त्याच्या दिशेने बाटली भिरकावून लावली होती. पोलिसांच्या चौकशीतही हल्लेखोराने असेच वक्तव्य केले आहे.

विभाग