मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Raju Srivastav: राजू श्रीवास्तवसाठी कैलाश खेरने केले चाहत्यांना आवाहन, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

Raju Srivastav: राजू श्रीवास्तवसाठी कैलाश खेरने केले चाहत्यांना आवाहन, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

Aarti Vilas Borade HT Marathi
Aug 14, 2022 04:03 PM IST

राजू श्रीवास्तव यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर कैलाश खेर यांचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

कैलाश खेर
कैलाश खेर (HT)

गेल्या चार दिवसांपासून प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ११ ऑगस्ट २०२२ रोजी राजू यांना हृदय विकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून ते अद्याप शुद्धीवर आलेले नाहीत. त्यांची प्रकृती आणखी खालावली आहे. संपूर्ण देश ते बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत आहेत. अशातच बॉलिवूड गायक कैलाश खेरने राजू श्रीवास्तवसाठी एक मेसेज पाठवला आहे. त्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे.

कैलाश खेरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो राजू श्रीवास्तव लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करण्यास सांगत आहे. 'नमस्कार मी कैलाश खेर, मी संपूर्ण भारत आणि विश्वातील लोकांना विनंती करतो की राजू श्रीवास्तव माझा मित्र आणि मोठ्या भाऊ सध्या कठीण काळातून जात आहे. त्याची प्रकृती खालावली आहे. त्याच्याविषयी अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. अनेकांनी त्यांचे निधन झाले अशा बातम्या केल्या आहेत. या अफवांकडे दुर्लक्ष करुन त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आम्ही देखील महामृत्यूंजय मंत्राचा जप कर आहोत' असे कैलाश खेर म्हणाला.

हा व्हिडीओ करत कैलाश खेरने, 'प्रार्थनांमध्ये देवाला मदतीसाठी बोलावण्याची शक्ती आहे. असंख्य कोटी मने जिंकणारा, सर्वांना हसवणाऱ्या राजू श्रीवास्तवला हृदय विकाराचा झटका आला. या कठीण काळात अफवा पसरवू नका. केवळ प्रार्थना करत रहा' या आशयाचे कॅप्शन दिले आहे. राजू श्रीवास्तव यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

राजू श्रीवास्तव कॉमेडिचा बादशाह म्हणून ओळखले जातात. त्यांना आजवर अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांच्या विनोदीवृत्तीने चाहत्यांना खळखळून हसवले आहे. त्यांनी करिअरची सुरुवात एका स्टेज शोने केली होती. त्यानंतर बॉलिवूडमधील काही चित्रपटात छोटे रोल त्यांनी केले. त्यांना 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या शोने खरी ओळख मिळवून दिली. या शोचे ते सेकंड रनरअप ठरले.

IPL_Entry_Point

विभाग