मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Satish Kaushik : चाहत्यांचं कॅलेंडर काळाच्या पडद्याआड; सतीश कौशिक यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार

Satish Kaushik : चाहत्यांचं कॅलेंडर काळाच्या पडद्याआड; सतीश कौशिक यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार

Mar 10, 2023, 01:54 PM IST

    • Satish Kaushik Funeral : बॉलिवूड अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं ह्रदयविकाराच्या तिव्र झटक्यानं निधन झालं होतं.
Satish Kaushik Funeral In Mumbai (HT)

Satish Kaushik Funeral : बॉलिवूड अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं ह्रदयविकाराच्या तिव्र झटक्यानं निधन झालं होतं.

    • Satish Kaushik Funeral : बॉलिवूड अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं ह्रदयविकाराच्या तिव्र झटक्यानं निधन झालं होतं.

Satish Kaushik Funeral In Mumbai : बॉलिवूड अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा ह्रयविकाराच्या तिव्र झटक्यानं निधन झाल्यानंतर आता मुंबईच्या वर्सोव्यातील स्माशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलं आहे. यावेळी त्यांच्या कुटुबियांसहित बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांनी हजेरी लावली. अभिनेता रणवीर कपूर आणि अभिनेते अनुपम खेर यांच्यासह असंख्य चाहत्यांनी आपल्या आवडत्या कलाकाराचं अंतिम दर्शन घेत त्याला अखेरचा निरोप दिला आहे. गेल्या ४५ वर्षांपासून एकत्र काम करत असल्याची भावना व्यक्त करत अनुपम खेर यांचे डोळे पाणावले होते. याशिवाय चाहत्यांसह कौशिक यांच्या कुटुंबियांनी अतिव दुख: व्यक्त करत सतीश कौशिक यांचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांच्या मुलानं मुखाग्नी दिल्यानंतर सतीश कौशिक अनंतात विलीन झाले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Bharti Singh: ३ दिवस सतत त्रास झाल्यानंतर कॉमेडियन भारती सिंह रुग्णालयात दाखल, होणार सर्जरी

सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये खुलतय प्रेम, काय असेल सावनीचा नवा डाव? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार वाचा

Ajinkya Deo Birthday: अभिनेते अजिंक्य देव यांचा पहिला हॉलिवूड सिनेमा माहिती आहे का? जाणून घ्या त्यांच्याविषयी

'हिच्या पेक्षा तर उर्फी बरी...', करण कुंद्राची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश कपड्यांमुळे झाली ट्रोल

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिषेक बच्चन यांनी देखील सतीश कौशिक यांच्या पार्थिव शरीराचं दर्शन घेत त्यांच्या आठवणी जागवल्या. दिग्गज अभिनेत्यांसह चाहत्यांनी सतीश कौशिक यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होत त्यांच्यासाठी प्रार्थना केली आहे. आपल्या जवळच्या मित्रांसोबत होळी साजरी करण्यासाठी सतीश कौशिक दिल्लीत गेले होते. धुळवड साजरी केल्यानंतर त्यांना हार्ट अटॅकचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता. गुरुग्रामच्या फोर्टिस रुग्णालयात त्यांच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर त्यांचं पार्थिव शरीर विशेष विमानानं मुंबईत आणण्यात आलं होतं.

सतीश कौशिक यांनी बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय आणि सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. याशिवाय अनेक चित्रपटांच्या दिग्दर्शनही कौशिक यांनी केलेलं होतं. त्यांच्या निधनामुळं बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत, रिचा चड्ढा, प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा, आलिया भट यांच्यासह अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि रणदीप हुडा यांच्यासह अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.