मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ekta Kapoor: एकता कपूर विरोधात गुन्हा दाखल, कोर्टात हजर राहण्याचे आदेश

Ekta Kapoor: एकता कपूर विरोधात गुन्हा दाखल, कोर्टात हजर राहण्याचे आदेश

Aarti Vilas Borade HT Marathi

Sep 28, 2022, 04:26 PM IST

    • Ekta Kapoor Arrest: बिहारमधील बेगूसराय न्यायालयाने अटक करण्याचे आदेश दिले आहेत.
एकता कपूर (HT)

Ekta Kapoor Arrest: बिहारमधील बेगूसराय न्यायालयाने अटक करण्याचे आदेश दिले आहेत.

    • Ekta Kapoor Arrest: बिहारमधील बेगूसराय न्यायालयाने अटक करण्याचे आदेश दिले आहेत.

टीव्ही क्वीन म्हणून एकता कपूर ओळखली जाते. ती सतत तिच्या चित्रपट आणि मालिकांमुळे चर्चेत असते. आता एकता कपूरविरोधात बेगूसराय न्यायालयाने अटकेची मागणी केली आहे. गेल्या वर्षी माजी सैनिक संघाचे जिल्हा अध्यक्ष शंभू कुमार यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता त्यावर बिहार येथील बेगूसराय न्यायालयाने सुनावली केली असून एकता कपूरला अटक करण्याचे आदेश दिले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

झीरोतून बनले हिरो अन् उभी केली ‘टी सीरिज’ कंपनी! गुलशन कुमार यांची संघर्षकथा माहितीय का?

‘सोढी’ हरवलाय! आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या कलाकारांची दिल्ली पोलिसांकडून चौकशी होणार

सप्तसूर आणि गाणी रंगणार; आर्या आंबेकर, मामे खान आणि पूरबियान चॅटर्जी यांची मुंबईत मैफल भरणार!

‘हीरामंडी’साठी २०० कोटी, तर ‘पंचायत ३’साठी ८० कोटी; ‘या’ लोकप्रिय वेब सीरिज्सच्या निर्मितीचं बजेट माहितीय?

एकता कपूरची 'ट्रिपल एक्स' ही सीरिज आली होती. या सीरिजमधील काही दृश्यांमध्ये सैनिकांचा अपमान केल्याचा आरोप एकतावर होता. त्यामुळे बिहारमधील बेगूसराय येथे एकता विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. आता बेगूसराय न्यायालयाने एकता कपूर आणि शोभा कपूर यांना समन्स बजावले आहेत.
वाचा: “आलिया बेडवर…”, रणबीरने सांगितले बेडरुम सिक्रेट

बरौनी पोलीस ठाण्यात सिमरिया आदर्श गाव येथे राहणारे शंभू कुमार यांनी एकता कपूर विरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची सुनावणी बिहारच्या बेगुसरायमधील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी राजीव कुमार यांनी केली. त्यांनी एकता कपूर आणि शोभा कपूर यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

शंभू कुमार हे स्वत: सैन्यात भरती होते. त्यामुळे 'ट्रिपल एक्स' सीरिजमधील जवानाच्या पत्नीचे दाखवण्यात आलेले सीन्स हे अनेकांच्या भावना दुखावणारे आहेत असा आरोप त्यांनी केला आहे.

विभाग