मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Alia Bhatt: “आलिया बेडवर…”, रणबीरने सांगितले बेडरुम सिक्रेट

Alia Bhatt: “आलिया बेडवर…”, रणबीरने सांगितले बेडरुम सिक्रेट

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 27, 2022 08:44 AM IST

Brahmastra: आलिया आणि रणबीरने ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या यशानंतर एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. तेव्हा खासगी आयुष्यातील अनेक सिक्रेट सांगितले आहेत.

रणबीर आणि आलिया
रणबीर आणि आलिया (HT)

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरचा काही दिवसांपूर्वी ब्रह्मास्त्र चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील दोघांच्याही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरल्या. या चित्रपटाला यश मिळाल्यानंतर रणबीर आणि आलियाने एका मुलाखतीमध्ये चित्रपटाविषयी तसेच खासगी आयुष्याविषयी अनेक खुलासे केले. रणबीरने तर चक्क बेडरुम सिक्रेट सांगितले आहे.

रणबीरने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये आलियाच्या विचित्र सवयीविषयी सांगितले आहे. 'आलियाची झोपण्याची पद्धत खूप विचित्र आहे. ती रात्रभर बेडवर गोल गोल फिरत असते. त्यामुळे मला झोपताना बेडच्या एका कोपऱ्यात झोपावे लागते. बेड कितीही मोठा असला तरी मला एका कोपऱ्यात झोपावं लागतं. मला तिच्या या सवयीचा वैताग आला आहे. पण मला हे सहन करावे लागते' असे रणबीर म्हणाला.
वाचा : “राम सेतू बचाने के लिए हमारे पास तीन दिन है” अक्षयच्या रामसेतूचा टीझर प्रदर्शित

पुढे आलियाने रणबीरची आवडत नसलेल्या सवयीविषयी सांगितले. 'जेव्हा मला काही सांगायचे असते तेव्हा रणबीर शांत पणे ते ऐकून घेतो. पण मला वाटतं अनेकदा ज्या ठिकाणी त्याने काही बोलायची गरज असते. तेव्हाही तो शांत राहतो. अशावेळी त्याचे शांत राहाणे मला त्रासदायक वाटते' असे आलिया म्हणाली.

रणबीर आलियाचा ९ सप्टेंबर २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या ब्रह्मास्त्र चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जीने केले आहे. या चित्रपटासाठी अयानने जवळपास ८ वर्षे घालवली. या चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor), आलिया भट्ट (Alia Bhatt), नागार्जुन (nagarjuna), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि मौनी रॉय (Mouni Roy) हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. ब्रह्मास्त्र चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाचा दुसरा भाग 'ब्रह्मास्त्र २: देव' याची आतुरतेने वाट पाहात आहेत.

IPL_Entry_Point