मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ram Setu Teaser: “राम सेतू बचाने के लिए हमारे पास तीन दिन है” अक्षयच्या रामसेतूचा टीझर प्रदर्शित

Ram Setu Teaser: “राम सेतू बचाने के लिए हमारे पास तीन दिन है” अक्षयच्या रामसेतूचा टीझर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 26, 2022 02:16 PM IST

Akshay Kumar: येत्या २५ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

राम सेतू
राम सेतू (HT)

अक्षय कुमार आणि जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत असणारा बहुचर्चित चित्रपट म्हणजे 'राम सेतू.' या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. चित्रपटातील अक्षय कुमारचा लूक पाहात चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली होती. आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

राम सेतू चित्रपटाच्या ५६ सेकंदाच्या टीझरमध्ये अक्षय कुमार राम सेतू वाचवण्याच्या मोहीमेवर असतो. त्यासाठी त्याला केवळ तीन दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. तसेच अक्षय कुमारची धडपड दाखवण्यात आली आहे. जॅकलिन ही एकदम हटके लूकमध्ये दिसत आहे. टीझरमध्ये दमदार अ‍ॅक्शन सीन्स पाहायला मिळत आहेत. एकंदरीत चित्रपटाचा टीझर पाहून हा बिग बजेट चित्रपट असल्याचे दिसून येते.
वाचा: क्लासिक गाण्याची वाट लावू नको म्हणणाऱ्या फाल्गुनी पाठकला नेहा कक्करचं सडेतोड उत्तर

अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टीझर शेअर केला आहे. हा टीझर शेअर करत 'राम सेतूची पहिली झलक फक्त तुमच्यासाठी.. मला आशा आहे आम्ही इतक्या मेहनतीने बनवलेला टीझर तुम्हाला आवडेल' या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

'राम सेतू' या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केले आहे. या चित्रपटात अक्षय आणि जॅकलिनसोबत भिनेत्री नुसरत भरुचा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. येत्या २५ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग