मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Vat Purnima: बॉलिवूडचे सत्यवान-सावित्री! अमिताभ हॉस्पिटलमध्ये असताना जया बच्चन वाचत होत्या हनुमान चालीसा
Harshada Bhirvandekar • HT Marathi

Jun 03, 2023, 10:33 AM IST

  • Amitabh-Jaya Bachchan 50th Anniversary: अमिताभ बच्चन मृत्यूशी झुंज देत असताना, जया बच्चन हॉस्पिटलमध्येच हनुमान चालीसा पठण करत होत्या.

Amitabh-Jaya Bachchan 50th Anniversary: बॉलिवूडची ‘फेव्हरेट जोडी’ अर्थात अमिताभ बच्चन आणि जया बच्चन आज (३ जून) त्यांच्या लग्नाचा ५०वा वाढदिवस साजरा करत आहेत. विशेष म्हणजे आजच्याच दिवशी वट पौर्णिमा देखील आहे. ज्याप्रकारे सावित्रीने यमाशी लढून सत्यवानाचे प्राण वाचवले होते. त्याचप्रमाणे अमिताभ बच्चन मृत्यूशी झुंज देत असताना, जया बच्चन हॉस्पिटलमध्येच हनुमान चालीसा पठण करत होत्या. त्यांनी देखील देवाचा धावा करून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

ट्रेंडिंग न्यूज

Rajesh Khattar Birthday: अभिनेताच नव्हे तर हॉलिवूड कलाकारांचा आवाजही! शाहिद कपूरच्या सावत्र वडिलांबद्दल माहितीय?

Nava Gadi Nava Rajya: चिंगीची बहीण येणार अन् हौदोस घालणार? ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेत नवं वळण

Sara Kahi Tichyasathi: उमा मावशी बनणार ओवीची आई; लेकीला समजवणार कोकणातील सणांचं महत्त्व!

Rashmika Mandanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू अन् साडी; रश्मिका मंदानाचा ‘अ‍ॅनिमल’ लूक पाहिलात?

अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती, जेव्हा ते जीवन आणि मृत्यू यांच्यातील लढाई लढत होते. अमिताभ बच्चन त्यांच्या एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका मोठ्या अपघाताला बळी पडले होते, ज्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. अमिताभ बच्चन यांचा ‘कुली’ हा चित्रपट १९८२मध्ये रिलीज झालेला. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि पुनीत इस्सार यांच्यावर एक फाईट सीन शूट केला जात होता. या दृश्यादरम्यान पुनीत यांनी लगावलेला ठोसा चुकून अमिताभ बच्चन यांच्या पोटात लागला. त्यांचा हा ठोसा इतका जोरदार होता की, त्यामुळे त्यांची आतडे फाटली आणि त्यांच्या पोटात खोल जखम झाली. अमिताभ यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर अनेक ऑपरेशन्स करण्यात आले.

Sonakshi Sinha: झहीर इकबालनं सोनाक्षी सिन्हाला म्हटलं ‘I Love You’; अशी होती अभिनेत्रीची प्रतिक्रिया...

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुनीतच्या या पंचमुळे अमिताभ यांचे पोट अक्षरशः फाटले होते. अभिनेत्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. असे म्हणतात की एक काळ असा होता की, डॉक्टरांनी देखील हार मानली होती. अमिताभ बच्चन यांना एक चमत्कारच वाचवू शकतो, असे सगळ्यांना वाटत होते. आणि मग खरोखरच एक चमत्कार घडला आणि अमिताभ यांची तब्येत बरी होऊ लागली.

अमिताभ रुग्णालयात असताना पत्नी जया बच्चन सतत हनुमान चालीसाचे पठण करत होत्या, असे म्हटले जाते. जया यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की, अमिताभ जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये होते, तेव्हा डॉक्टर त्यांचा जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होते. डॉक्टर अमिताभ यांच्या छातीत पंप करत असताना नर्स इंजेक्शन देत असल्याचे जया यांनी पाहिले. दरम्यान, जया बच्चन हनुमान चालीसाचे पठण करत होत्या. त्याचवेळी त्यांच्या लक्षात आले की, अमिताभ बच्चन यांच्या पायाच्या बोटाची हालचाल झाली. अमिताभ बच्चन यांना शुद्ध येतेय हे जाणवतच, जया यांनी त्यानंतर डॉक्टरांना तातडीने कळवले. त्यानंतर हळूहळू अमिताभ यांच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली.

विभाग