मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sonakshi Sinha: झहीर इकबालनं सोनाक्षी सिन्हाला म्हटलं ‘I Love You’; अशी होती अभिनेत्रीची प्रतिक्रिया...

Sonakshi Sinha: झहीर इकबालनं सोनाक्षी सिन्हाला म्हटलं ‘I Love You’; अशी होती अभिनेत्रीची प्रतिक्रिया...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jun 03, 2023 08:18 AM IST

Sonakshi Sinha Rumored Boyfriend : सोनाक्षी आणि झहीर याआधीही सोशल मीडियावर एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करताना दिसले आहेत.

Sonakshi Sinha Rumored Boyfriend Zaheer Iqbal
Sonakshi Sinha Rumored Boyfriend Zaheer Iqbal

Sonakshi Sinha Rumored Boyfriend : बॉलिवूडची ‘दबंग’ सोनाक्षी सिन्हा हिने नुकताच तिचा ३६वा वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी तिला शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये चर्चेत असलेला तिचा कथित बॉयफ्रेंड झहीर इकबाल याच्या नावाचाही समावेश आहे. बॉलिवूडच्या कॉरीडोरमध्ये अशी चर्चा आहे की, सोनाक्षी सध्या झहीरला डेट करत आहे. दरम्यान आता झहीरने शेअर केलेल्या वाढदिवसाच्या लांबलचक पोस्टने लोकांचे लक्ष वेधून घेतले. या पोस्टवर सोनाक्षीसह बॉलिवूड सेलिब्रिटींच्या अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.

सोनाक्षीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना झहीरने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘कुछ तो लोगो कहेंगे, लोगो का काम है कहना…. तू नेहमीच माझा आधार घेऊ शकतेस. तु सर्वोत्तम आहेस... अशीच गर्जत रहा आणि नेहमी उडत रहा. कोणीही पाहिलं नसेल अशा नजरेतून तू संपूर्ण जग पाहा, नेहमी जलपरीसारखं जग. नेहमी आनंदी रहा. आय लव्ह यु’. या पोस्टमध्ये त्याने 'परफेक्ट' हॅशटॅग देखील वापरला आहे.

या पोस्टवर प्रतिक्रिया देताना, सोनाक्षीने अनेक हार्ट इमोजी टाकल्या आहेत. तिच्या या प्रतिक्रियेनंतर अभिनेता वरुण शर्मा, नुपूर सेनन, प्रियांक शर्मा आणि साकिब सलीम यांच्यासह इतर अनेक सेलिब्रिटींनी या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. अनेक दिवसांपासून सोनाक्षी आणि झहीर यांच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत येत आहेत. मात्र, दोघांनी आपण केवळ बेस्ट फ्रेंड असल्याचं म्हटलं होतं.

सोनाक्षी आणि झहीर याआधीही सोशल मीडियावर एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करताना दिसले आहेत. दोघांनीही सलमान खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. सोनाक्षीने २०१०मध्ये ‘दबंग’ चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तर, सलमान खानच्या २०१९ मध्ये रिलीज झालेल्या ‘नोटबुक’ या चित्रपटात झहीर इकबाल झळकला होता. तर, या जोडीने ‘डबल एक्सएल’ या चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते. नुकतेच सोनाक्षी सिन्हा हिने ‘दहाड’मधून ओटीटीवर पाऊल ठेवले आहे. या वेब सीरिजमधील सोनाक्षीचा अभिनय लोकांना आवडला आहे. ‘दहाड’ रिलीज झाल्यानंतर तिला लोकांकडून भरभरून प्रेम मिळत असल्याचे सोनाक्षीने म्हटले आहे.

IPL_Entry_Point