मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Salman Khan: जिवाच्या भीतीनं सलमान खान याचा बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज

Salman Khan: जिवाच्या भीतीनं सलमान खान याचा बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज

Jul 23, 2022, 01:14 PM IST

    • Salman Khan meets Mumbai Police Commissioner: बॉलिवूड स्टार सलमान खान यानं आज मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली.
Salman Khan

Salman Khan meets Mumbai Police Commissioner: बॉलिवूड स्टार सलमान खान यानं आज मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली.

    • Salman Khan meets Mumbai Police Commissioner: बॉलिवूड स्टार सलमान खान यानं आज मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली.

Salman Khan meets Mumbai Police Commissioner: अभिनेता सलमान खान यानं आज अचानक मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली. भेटीनंतर सलमान मीडियाशी एक शब्दही न बोलता निघून गेल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ajinkya Deo Birthday: अभिनेते अजिंक्य देव यांचा पहिला हॉलिवूड सिनेमा माहिती आहे का? जाणून घ्या त्यांच्याविषयी

'हिच्या पेक्षा तर उर्फी बरी...', करण कुंद्राची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश कपड्यांमुळे झाली ट्रोल

‘द कपिल शर्मा शो’ दोन महिन्यातच होणार बंद? अर्चना पूरण सिंहने चाहत्यांना दिला झटका

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये ‘रोशन सिंह सोढी’ साकारण्यासाठी गुरुचरण सिंहला किती मानधन मिळायचे?

सलमान खान सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास क्रॉफर्ड मार्केट येथील पोलीस मुख्यालयात पोहोचला. त्यानंतर पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर (Vivek Phansalkar) यांची भेट घेतली. तसंच त्यानं सहपोलीस आयुक्त (कायदा सुव्यवस्था) विश्वास नागरे पाटील यांचीही भेट घेतली. भेटीचं कारण कळू शकलं नाही. भेटीनंतर मीडियाच्या प्रतिनिधींना सलमानला कारण विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही न बोलताच कारमध्ये बसून तो निघून गेला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वसंरक्षणासाठी सलमान खान याला शस्त्र बाळगण्याचा परवाना हवा आहे. त्या संदर्भातील अर्ज देण्यासाठी तो आज पोलीस आयुक्तांना भेटला. अर्थात, पोलिसांकडून अद्याप या माहितीला दुजोरा देण्यात आलेला नाही.

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येनंतर सलमान खान चर्चेत आला होता. मुसेवाला याच्या हत्येमागे लॉरेन्स बिष्णोई टोळीचा हात असल्याचा संशय होता. मुसेवाला याच्याप्रमाणेच सलमानलाही संपवण्याची धमकी अज्ञातांनी दिली होती. तसं धमकी पत्र सलमानचे वडील सलीम खान यांना देण्यात आलं होतं. त्यानंतर सलमानच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली होती. 

सलमान खान हा हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीचा कलाकार आहे. त्याचे चार चित्रपट आतापर्यंत ३०० कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट झाले आहेत. अलीकडं प्रदर्शित झालेले त्याचे दोन चित्रपट फारसे चालले नव्हते. मात्र, लवकरच त्याचे किक २, पवन पुत्र भाईजान, कभी ईद कभी दिवाली आणि 'नो एंट्री २' हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. 'टायगर ३' कडूनही निर्मा्त्यांना मोठ्या आशा आहेत. हा चित्रपट बॉक्सऑफिसवर नवे विक्रम करेल, असं बोललं जात आहे.