मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shamshera Review: बॉलिवूड सिनेमांसाठी संजीवनी ठरतोय शमशेरा

Shamshera Review: बॉलिवूड सिनेमांसाठी संजीवनी ठरतोय शमशेरा

Aarti Vilas Borade HT Marathi
Jul 22, 2022 04:28 PM IST

Ranbir Kapoor : शमशेरा चित्रपटातील संजय दत्त आणि रणबीर कपूरच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिलेल्या रेटिंगने सर्वांना धक्काच बसला आहे.

शमशेरा
शमशेरा (HT)

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा जवळपास चार वर्षांनंतर 'शमशेरा' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा बिग बजेट चित्रपट २०१९मध्ये प्रदर्शित होणार होता. पण करोनामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. या चित्रपटात रणबीर कपूरसोबतच वाणी कपूर, संजय दत्त (Sanjay Dutt), सौरभ शुक्ला आणि रोनित रॉय यांच्याही भूमिका आहेत. तर दिग्दर्शन करण मल्होत्राने केले आहे. या चित्रपटाचे बजेट जवळपास १५० कोटी रुपये आहे. आज हा चित्रपट प्रदर्शित झाला असून चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी रेटिंग दिले आहे.

शमशेरा चित्रपटात काझा या शहराची काल्पनिक कथा दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट १८व्या शतकात घेऊन जातो. या चित्रपटात खमेरन जातीच्या लोकांची कथा दाखवण्यात आली आहे. हे लोक काझा या शहरात जातात तेव्हा तेथील उच्चवर्णीय लोक त्यांचा स्वीकार करत नाहीत. तेव्हा त्यांचा सरदार शमशेरा म्हणजेच रणबीर कपूर त्याच्या मित्रांसोबत उदर्निवाहसाठी लूटमार करण्यास सुरुवात करतो. काझामधील उच्चवर्णीय लोक शमशेराला कंटाळलेले असतात. ते अनेक ठिकाणी त्याची तक्रार करतात. नंतर सरकार इन्स्पेक्टर शुद्ध सिंग म्हणजेच संजय दत्तची काझामध्ये पोस्टींग करते.

शुद्ध सिंग चतुराईने शमशेरा आणि त्याच्या साथीदारांना काझा किल्ल्यात गुलाम बनवून ठेवतो. शमशेरा सर्वांना सोडवण्याचा प्रयत्न करतो. नंतर चित्रपट २५ वर्षे पुढे जातो. तेव्हा चित्रपटात शमशेराला बिल्ली नवाचा मुलगा दाखवण्यात आला आहे. हा बिल्ली अगदी हुबेहुब वडिलांसारखा दिसतो. आता बिल्ली शुद्ध सिंगशी कसा लढणार? वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार का? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी चित्रपटाला खूप कमी रेटिंग दिली आहे. त्यांनी चित्रपटाचे पोस्टर शेअर करत, "‘शमशेरा’ पचनी न पडणारा… ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ आणि ‘केजीएफ’चा कॉकटेल म्हटले तरी वावगं ठरणार नाही. रणबीरने चित्रपटात उत्तम काम केले आहे. पण चित्रपट निराश करणारा आहे" या आशयाचे कॅप्शन दिले आहे. काही प्रेक्षकांनी चित्रपट चांगला असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

IPL_Entry_Point

विभाग