मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Mann Kasturi Re Review: मराठी चित्रपटाला मसालापटाचा तडका! कसा आहे ‘मन कस्तुरी रे’? वाचा...

Mann Kasturi Re Review: मराठी चित्रपटाला मसालापटाचा तडका! कसा आहे ‘मन कस्तुरी रे’? वाचा...

Nov 05, 2022, 11:42 AM IST

  • Mann Kasturi Re Review: ‘मन कस्तुरी रे’ या चित्रपटातून अभिनेता अभिनय बेर्डे आणि अभिनेत्री तेजस्वी प्रकाश यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

Man Kasturi Re

Mann Kasturi Re Review: ‘मन कस्तुरी रे’ या चित्रपटातून अभिनेता अभिनय बेर्डे आणि अभिनेत्री तेजस्वी प्रकाश यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

  • Mann Kasturi Re Review: ‘मन कस्तुरी रे’ या चित्रपटातून अभिनेता अभिनय बेर्डे आणि अभिनेत्री तेजस्वी प्रकाश यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

Mann Kasturi Re Review: ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेला अभिनेता अभिनय बेर्डे (Abhinay Berde) पुन्हा एकदा एका हटके भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मन कस्तुरी रे’ या मराठी चित्रपटात त्याला साथ लाभलीये ती ‘बिग बॉस’ विजेती अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) हिची. अभिनेत्री तेजस्वी प्रकाश हिचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. अनेक बिग बजेट बॉलिवूड चित्रपटांना थेट टक्कर देत हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. कथा जरी पाहिल्यासारखी वाटत असली, तरी तिला दिलेला मराठी तडका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये ‘रोशन सिंह सोढी’ साकारण्यासाठी गुरुचरण सिंहला किती मानधन मिळायचे?

अभिरामचं लग्न मोडण्यामागचं सत्य कुणाला कळू शकेल का? ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत ट्वीस्ट

कुणालच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी चैतन्यसोबत सुभेदार कुटुंबही झालं सज्ज! ‘ठरलं तर मग’मध्ये रोमांचक वळण

भारतीय क्रिकेट टीमसाठी ‘अश्वत्थामा’ बनले अमिताभ बच्चन! सोशल मीडियावरील Viral Video पाहिलात का?

‘मन कस्तुरी रे’ या चित्रपटाची कथा आहे ती प्रेमात घेतलेल्या बदल्याची. सिद्धांत (अभिनय बेर्डे) आणि श्रुती (तेजस्वी प्रकाश) या दोघांची प्रेमकथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. श्रुती श्रीमंत घरातील लाडाची लेक, तर सिद्धांत एका गरीब कुटुंबातील मुलगा आहे. चाळीत छोट्याशा घरात राहणाऱ्या सिद्धांतची स्वप्न खूप मोठी आहेत. त्याला खूप शिकून आईला एका मोठ्या घरात न्यायचं आहे. यासाठी तो पडेल ती काम करतो. अशाच एका लग्नकार्यात वेटरचं काम करत असताना त्याची श्रुतीशी भेट होते. पहिल्याच भेटीत श्रुती सिद्धांतकडे आकर्षित होते आणि त्याच्याशी फ्लर्ट करू लागते. मात्र, सिद्धांत तिला फार भाव देत नाही. तर, श्रुती देखील स्वतःची जिद्द सोडत नाही.

अखेर तिच्या हट्टापुढे सिद्धांत नमतं घेतो आणि सुरू होते त्यांची प्रेमकथा... सगळं काही सुरळीत सुरू असताना प्रेमकथेत अडथळा बनून येतात ते नायिकेची श्रीमंत वडील. व्यवसायाने बिल्डर असलेले श्रुतीचे वडील आपल्या मुलीचं लग्न बांधकाम मंत्र्यांच्या मुलाशी ठरवून झालेले असतात. दरम्यान ते सिद्धांत आणि श्रुतीला एकत्र पाहतात. इथूनच सुरुवात होते दोघांची प्रेमकथा उद्ध्वस्त होण्याची... घरातल्यांचा आपल्या प्रेमाला विरोध म्हणून पळून सिद्धांतकडे आलेल्या श्रुतीला शोधून तिचे वडील तिच्या मनात विष कालवतात. काय खरं आणि काय खोटं हे जाणून न घेता सिद्धांत आणि श्रुतीमध्ये जोरदार वाद होतात. सिद्धांतने आपल्याला फसवलं असं वाटून श्रुती त्याच्या विरोधात बलात्काराची केस दाखल करते. या आरोपात सिद्धांत तुरुंगात जातो.

सिद्धांतची काहीही चूक नसताना त्याला खूप काही सहन करावं लागतं. वकीलाकडून त्यांची फसवणूक, आईचे दागिने, घर सगळंच पणाला लागतं. मात्र, तरीही सिद्धांतची सुटका होत नाही. एक दिवशी श्रुतीला आपल्या वडिलांनी केलेल्या फसवणूकीबद्दल कळतं आणि हा चित्रपटात एक मोठा ट्विस्ट येतो. चित्रपटाचा हा ट्विस्ट प्रेक्षकाला चांगलाच धक्का देतो. अर्थात हा ट्विस्ट काय ते जाणून घेण्यासाठी ‘मन कस्तुरी रे’ हा चित्रपट एकदा पाहायलाच हवा.

चित्रपटाचा पूर्वार्ध काहीसा रटाळवाणा वाटतो. मात्र, उत्तरार्धात प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात चित्रपट यशस्वी ठरला आहे. तेजस्वी प्रकाशचा हा पहिलाच चित्रपट आहे, हे प्रत्येक फ्रेममध्ये जाणवतं. तेजस्वी आणि अभिनयची केमिस्ट्री फारशी जुळत नसल्याचं सतत वाटतं. तर, चित्रपटात अभिनयाच्या मित्रांची भूमिका साकारणारे तीनही कलाकार चांगलाच भाव खाऊन गेले आहेत. त्यांच्या विनोदांनी प्रेक्षकांना खळखळवून हसवले आहे. चित्रपटाची गाणी मात्र फारच सुमार वाटली. मात्र, या सगळ्यात कौतुक व्हावं ते कॅमेरा हाताळणाऱ्या व्यक्तीचं.. चित्रपटाच्या अनेक फ्रेम्स मनात घर करून राहतात. मग, ती गिरगावची चाळ असो, वा तुरुंगातील हाणामारी... एकंदरीत एका मराठी चित्रपटाला ‘मसाला’ तडका देण्याची ही कल्पना काहीशी पूर्ण झाली आहे.

चित्रपट: मन कस्तुरी रे

दिग्दर्शक: संकेत माने

प्रमुख कलाकार: अभिनय बेर्डे, तेजस्वी प्रकाश, वीणा जामकर

स्टार : २.५

विभाग