मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte : वीणा अनिरुद्धवर डोळे झाकून विश्वास ठेवतेय, मालिकेत वेगळे वळण

Aai Kuthe Kay Karte : वीणा अनिरुद्धवर डोळे झाकून विश्वास ठेवतेय, मालिकेत वेगळे वळण

Aarti Vilas Borade HT Marathi

May 18, 2023, 11:16 AM IST

    • Aai Kuthe Kay Karte Marathi Serial update: वीणाच्या येण्याने अरुंधती आणि आशुतोषच्या संसारावर काही परिणाम होणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
Aai Kuthe Kay Karte

Aai Kuthe Kay Karte Marathi Serial update: वीणाच्या येण्याने अरुंधती आणि आशुतोषच्या संसारावर काही परिणाम होणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

    • Aai Kuthe Kay Karte Marathi Serial update: वीणाच्या येण्याने अरुंधती आणि आशुतोषच्या संसारावर काही परिणाम होणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

स्टार प्रवाहच्या आई कुठे काय करते या मालिकेत नुकताच अनिश आणि ईशाचा साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याला कुटुंबातील सर्वच सदस्यांनी मजामस्ती केली. दरम्यान, ईशा आणि अनिशच्या साखरपुड्यानिमित्त आशुतोषची बहिण वीणाची मालिकेत एण्ट्री झाली. तिच्या एण्ट्रीने मालिका एका वळणावर पोहोचली आहे. वीणा आणि अनिरुद्ध यांच्यामधील नाते पाहून सर्वांनाच धक्का बसतोय.

ट्रेंडिंग न्यूज

सरगमची अट मान्य करून अक्षरा तिला घरात घेऊन येईल का? ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये येणार ट्वीस्ट

सायली देवासमोर खोटी शपथ घेणार की लग्नाचं सत्य कबुल करणार? ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर!

Salman Khan Firing Case: सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या पाचव्या आरोपीला अटक! गुन्हेगारांची केली होती मदत

‘लिंबू कलरची साडी’ गाजवणाऱ्या अश्विनी भावे यांच्याबद्दल ‘या’ भन्नाट गोष्टी माहितीय का? वाचाच...

स्टार प्रवाह वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'आई कुठे काय करते' मालिकेच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अरुंधती- आशुतोष आणि वीणा- अनिरुद्ध एकत्र दिसत आहेत. चौघेही आशुतोषच्या ऑफिसमध्ये बसलेले दिसत आहेत. त्यावेळी 'तुला शक्य असेल तेव्हा ट्रान्सफर ऑफ ओनरशीप करुया' असे आशुतोष वीणाला बोलतो आणि तिच्या हातात पेपर देतो.
वाचा: गौतमी पाटील का आली भेटायला?; उदयनराजेंनी हसत दिलं उत्तर, म्हणाले...

वीणा लगेच पेन घेते आणि त्यावर सही करण्यास तयार होते. तेवढ्यात अनिरुद्ध तिला थांबवतो आणि म्हणतो, 'कितीही जवळचं नातं असतलं तरीही न वाचता घेतलेले निर्णय चांगले नसतात.' ते ऐकून आशुतोष आणि वीणाला धक्का बसतो. वीणा पेपर अनिरुद्धकडे देते. तेवढ्यात अरुंधती वीणाला म्हणते की, 'जर पेपर तू वाचणार आहेस तर ते तुझ्याकडेच राहू दे.' ते ऐकून अनिरुद्ध चकीत होतो.

आता वीणाच्या येण्याने आशुतोष आणि अरुंधती यांच्या संसारावर काही परिणाम होणार का? अनिरुद्ध आणि वीणा यांच्यातील नाते वेगळे वळण घेणार का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. मालिकेच्या आगामी भागात त्यांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरे मिळणार आहेत.

विभाग