मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gautami Patil: गौतमी पाटील का आली भेटायला?; उदयनराजेंनी हसत दिलं उत्तर, म्हणाले...

Gautami Patil: गौतमी पाटील का आली भेटायला?; उदयनराजेंनी हसत दिलं उत्तर, म्हणाले...

Aarti Vilas Borade HT Marathi
May 17, 2023 12:41 PM IST

Gautami Patil: उदयनराजे भोसले यांना पत्रकार परिषदेत गौतमी पाटीलच्या भेटीचा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले.

Gautami Patil
Gautami Patil

राज्यभरात तरुणांच्या गळ्यातील ताईत ठरलेल्या व मार्केट जाम करणाऱ्या लावणी डान्सर गौतमी पाटीलने साताऱ्यातील कार्यक्रमाआधी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. या भेटीत तिने उदयनराजेंना खास गिफ्ट देखील दिले. सोशल मीडियावरील या चर्चेनंतर उदयनराजे भोसले यांनी गौतमी पाटील का भेटायला आली होती? याचं उत्तर दिलं आहे.

नुकताच उदयनराजे यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांना 'तुम्हाला गौतमी पाटील भेटायला का आली होती?' असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उदयनराजे यांनी पत्रकाराला उद्देशून म्हटले की, "तुमच्या चेहऱ्यावर स्माईल का आहे?” उदयनराजेंच्या या उत्तरानंतर एकच हशा पिकला.

पुढे गौतमीच्या भेटीबद्दल बोलताना ते म्हणाले, “गौतमी पाटील या एक कलाकार आहेत. जो कलेची दाद देतो, त्यांच्याकडेच त्या (गौतमी पाटील) जाणार ना… कलेची जाण नसणाऱ्या व्यक्तीकडे त्या का जातील? आगामी चित्रपट आणि इतर प्रकल्पासाठी माझ्याकडून त्यांना काहीतरी सहकार्य मिळेल, म्हणून त्या आल्या असतील. यासाठी त्यांना शुभेच्छा देणं आपलं कामच आहे.”

गौतमी पाटीलचा कार्यक्रम साताऱ्यात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमापूर्वी गौतमीने उदयनराजेंची भेट घेतली. उदयनराजेंच्या भेटीनंतर गौतमी पाटीलने माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले की, खासदार उदयनराजे यांची आज भेट घेतली. त्यांच्यासोबत विविध विषयावर चर्चा झाली. महाराजांना मी पहिल्यांदाच भेटले होते. महाराजांचा आशीर्वाद कायम सोबत राहावा, यासाठी मी आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

IPL_Entry_Point

विभाग