मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते'मधील संजनाने लूक का बदलला? सत्य आले समोर

Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते'मधील संजनाने लूक का बदलला? सत्य आले समोर

Aarti Vilas Borade HT Marathi

Oct 06, 2022, 12:20 PM IST

    • Rupali Bhosale: काही दिवसांपूर्वीच रुपालीने तिचा वेगळ्या लूकमधला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
संजना (HT)

Rupali Bhosale: काही दिवसांपूर्वीच रुपालीने तिचा वेगळ्या लूकमधला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

    • Rupali Bhosale: काही दिवसांपूर्वीच रुपालीने तिचा वेगळ्या लूकमधला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते.' या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले तिच्या वेगवेगळ्या लूक्समुळे नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच रुपालीने तिचा वेगळ्या लूकमधला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. रुपालीने हा लूक नेमका कश्यासाठी केला आहे याची तिच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता होती. या फोटोमागचं खरं रहस्य आता समोर आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

स्वाती आणि इंद्राने मागितली मुक्ता हिची माफी, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत काय घडणार जाणून घ्या

'बाईपण भारी देवा' सिनेमा घरबसल्या पाहायला? मग जाणून घ्या कधी आणि कुठे पाहायला मिळणार

अमिताभ बच्चन यांचं शेजारी व्हायचंय? मोजावी लागणार मोठी किंमत! जाणून घ्या काय आहे नेमकी भानगड

चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर कमल हासन यांच्या लेकीचा ब्रेकअप, काय आहे कारण?

रुपालीचा हा अनोखा अंदाज पाहायला मिळणार आहे प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळ्यामध्ये. 'अशी ही बनवाबनवी' सिनेमातील हृदयी वसंत फुलताना या गाण्यावर रुपाली परफॉर्म करणार आहे. याच परफॉर्मन्साठी रुपालीने सुप्रिया पिळगावकर यांच्या सिनेमातील लुकशी मिळताजुळता लूक करण्याचा प्रयत्न केला आहे.
वाचा: प्राजक्ता माळीचे घर आतुन पाहिलेत का? पाहा व्हिडीओ

या परफॉर्मन्ससाठी रुपाली अतिशय उत्सुक असून असा हटके प्रयोग तिने पहिल्यांदाच केला आहे. सुप्रसिद्ध अभिनेता भूषण प्रधानसोबत रुपाली या सदाबहार गाण्यावर थिरकताना दिसेल. तेव्हा रुपालीचा हा हटके अंदाज पाहाण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. त्यासाठी प्रवाह पिक्चर पुरस्कार २०२२ हा पाहयाल लागणार आहे.

विभाग