मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Prajakta Mali: प्राजक्ता माळीचे घर आतुन पाहिलेत का? पाहा व्हिडीओ

Prajakta Mali: प्राजक्ता माळीचे घर आतुन पाहिलेत का? पाहा व्हिडीओ

Aarti Vilas Borade HT Marathi
Oct 04, 2022 03:45 PM IST

Prajakta Mali House: प्राजक्ताचे घर हे अतिशय सुंदर आहे. तिच्या घराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

प्राजक्ता माळी
प्राजक्ता माळी (HT)

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी ओळखली जाते. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. प्राजक्ताविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण प्रचंड उत्सुक असतात. तुम्ही प्राजक्ता माळीचे घर पाहिले आहे का? चला पाहूया...

सोनी मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्राजक्ता माळीचे काही व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये प्राजक्ता तिचे घर दाखवत आहे. तसेच दिवसभरात ती काय करते याविषयी बोलताना दिसत आहे.
वाचा : 'मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला..', प्राजक्ताचा आनंद गगनात मावेना

प्राजक्ताने हॉलमध्ये पुस्तकांसाठी झाडाच्या आकाराचा स्टँड तयार केला आहे. तसेच पुरस्कार ठेवण्यासाठी एका कोपऱ्याचा वापर केला आहे. तिन हॉलमध्ये पांढऱ्या रंगाचा वापर केला आहे. प्राजक्ताच्या घरातील किचनदेखील सुंदर आहे. तिथे केलेल्या डायनिंग टेबलवर कधी जेवायला बसत नाही. पण काही वाचनासाठी किंवा लिखाणासाठी त्याचा वापर करते एकंदरीत प्राजक्ताचे घर हे अतिशय सुंदर आहे.

काही दिवसांपूर्वी प्राजक्ताची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत होती. परदेशात फिरायला गेलेल्या प्राजक्ताने भारताची आठवण येत असल्याचे म्हटले होते. या पोस्टमध्ये तिने, 'ने मजसी ने परत मातृभीला….सागरा प्राण तळमळला… भारताची आठवण येतेय असं म्हणणं चुकीचं राहिल.. आठवण त्यांची येते ज्यांना आपण विसरतो…एक क्षण देखील हिंदुस्तान माझ्या मनातून गेला नाही. इथं मन मूळीच रमलं नाही' असे म्हटले होते.

WhatsApp channel

विभाग