मराठी बातम्या  /  बिझनेस  /  whatsapp self message: व्हाॅट्सअ‍ॅपनं आणलं सेल्फ मेसेजिंगचं नवं फिचर; युजर्सना होणार ‘असा’ फायदा

whatsapp self message: व्हाॅट्सअ‍ॅपनं आणलं सेल्फ मेसेजिंगचं नवं फिचर; युजर्सना होणार ‘असा’ फायदा

Jan 09, 2023, 02:10 PM IST

  • whatsapp self message feature : व्हाॅटस्अॅप नवे सेल्फ मेसेजिंग फिचर्स दाखल करण्याच्या तयारीत आहेत. यात यूजर्स स्वत : स्वत ला मेसेजिंग करु शकणार आहेत. नव्या फिचर्सचे जाणून घ्या फायदे -

Whatsapp (PTI)

whatsapp self message feature : व्हाॅटस्अॅप नवे सेल्फ मेसेजिंग फिचर्स दाखल करण्याच्या तयारीत आहेत. यात यूजर्स स्वत : स्वत ला मेसेजिंग करु शकणार आहेत. नव्या फिचर्सचे जाणून घ्या फायदे -

  • whatsapp self message feature : व्हाॅटस्अॅप नवे सेल्फ मेसेजिंग फिचर्स दाखल करण्याच्या तयारीत आहेत. यात यूजर्स स्वत : स्वत ला मेसेजिंग करु शकणार आहेत. नव्या फिचर्सचे जाणून घ्या फायदे -

Whatsapp : सेल्फ मेसेजिंग ही काय भानगड आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण व्हाॅट्सअॅपच्या या नव्या फिचर्समुळे माणसाला गोष्टी लक्षात ठेवणे अधिक सोप्पे होणार आहे. कारण यूजर्स त्यांनी इथे नोंदी केलेल्या बाबींचा रेकाॅर्ड म्हणून वापर करु शकतील. यासोबतच गॅलरीमध्ये मेसेजेस सेव्ह केले जातील आणि जे नंतर अॅक्सेस करता येतील.

ट्रेंडिंग न्यूज

Sriniva pallia : विप्रोचे नवे सीईओ श्रीनिवास पल्लिया यांचं सॅलरी पॅकेज किती? पगाराबरोबर आणखी काय-काय मिळणार?

Ola layoffs : 'ओला' करणार १० टक्के कर्मचारी कपात! सीईओ हेमंत बक्षी यांनी दिला राजीनामा

Flipkart Sale: फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलची घोषणा; स्मार्टफोन, टीव्हीसह 'या' वस्तूंवर मिळणार तगडं डिस्काऊंट

Bank Holiday may 2024 : मे महिन्यात बँका किती दिवस बंद राहणार?; पाहा बँक हॉलिडेची यादी

व्हाॅसअॅपचा वापर जगभरात २०० कोटीहून अधिक यूजर्स मेसेजिंगसाठी केला जातो. भारतात ही संख्या अंदाजे ५५ कोटींपेक्षा अधिक आहे. यूजर्सच्या सोईसाठी व्हाॅट्सअॅप यात वेळोवेळी बदल करत असते.

त्यापैकीच एक सेल्फ मेसेजिंग फिचर असणार आहे. या फीचरमुळे यूजर्सला लक्षात ठेवण्यासाठी किंवा सेव्ह करण्यासाठी कोणताही मेसेज किंवा ऑडिओ, इमेज इत्यादी दुसऱ्याला पाठवण्याची गरज भासणार नाही. हे फीचर अँड्रॉइड आणि आयओएस सपोर्टेड मोबाईलमध्ये वापरले जाऊ शकते. त्याशिवाय यूजर्स स्वत ला मेसेज पाठवू शकतील. हे मेसेज मोबाईल गॅलरीमध्ये सेव्ह केले जाऊ शकतील आणि नंतर पाहता येतील. या फीचरच्या मदतीने यूजर्स टेक्स्ट मेसेजसह इमेज, इन्फोग्राफिक, ऑडिओ-व्हिडिओ फाइल्स स्वत:साठी सेव्ह करू शकतील.

दरम्यान, व्हाॅट्सअ‍ॅप अनेकदा युजर्सच्या मदतीसाठी आणि सुलभतेसाठी नवनवीन वैशिष्ट्ये आणते. यापूर्वी, व्हाॅट्सअ‍ॅपने ग्रुप अॅडमिनला अधिक अधिकार देण्यासाठी मेसेज डिलीट करण्याचे फीचर आणले होते. या फीचरमुळे ग्रुपवर अपमानास्पद किंवा अपमानास्पद संदेशांचा प्रसार रोखण्यात मदत झाली आहे. यामुळे अनेक दिवसांपासून एका ग्रुपमधून दुसऱ्या ग्रुपमध्ये अपमानास्पद संदेश पोहोचण्याची शक्यता संपुष्टात आली आहे.

विभाग