मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Whatsapp : व्हाॅट्सअ‍ॅपवर काॅल रेकाॅर्डिंग, या ४ स्टेप्स फाॅलो करा

Whatsapp : व्हाॅट्सअ‍ॅपवर काॅल रेकाॅर्डिंग, या ४ स्टेप्स फाॅलो करा

Dec 14, 2022, 06:29 PM IST

    • कोट्यावधी यूजर्स व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून एकमेकांना काॅल करतात. पण जर फोनवर बोलतानाच जर हा काॅल रेकाॅर्ड करायचा आहे, तर त्यासाठी खास ट्रिक आहे. थर्ड पार्टी अॅपच्या माध्यमातून हे शक्य आहे.
Whatsapp HT (PTI)

कोट्यावधी यूजर्स व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून एकमेकांना काॅल करतात. पण जर फोनवर बोलतानाच जर हा काॅल रेकाॅर्ड करायचा आहे, तर त्यासाठी खास ट्रिक आहे. थर्ड पार्टी अॅपच्या माध्यमातून हे शक्य आहे.

    • कोट्यावधी यूजर्स व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून एकमेकांना काॅल करतात. पण जर फोनवर बोलतानाच जर हा काॅल रेकाॅर्ड करायचा आहे, तर त्यासाठी खास ट्रिक आहे. थर्ड पार्टी अॅपच्या माध्यमातून हे शक्य आहे.

Whatsapp : अनेकदा व्हाॅट्सअॅपवर एखाद्या व्यक्तीसोबत बोलताना काॅल रेकाॅर्डिंगची गरज पडते. मात्र व्हाॅट्अॅपवर हे फिचर्स उपलब्ध नाही. मग अशावेळी निराशा हाती येते. आता यासाठी यूजर्स आता सोप्पी ट्रिक वापरु शकतात. त्यात आता प्रामुख्याने अॅड्राॅईड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफाॅर्मवर थर्ड पार्टी अॅपची मदत घेतली जाते, काही अॅड्राॅईड यूजर्स व्हाॅट्सअॅप काॅल रेकाॅर्ड करण्यासाठी स्क्रिन रेकाॅर्डरची मदत घेता येऊ शकते. अॅड्राॅईड आधारित काही कस्टम साॅफ्टवेअर स्किन्समध्ये या फिचरसह सिस्टिम वाॅल्यूम रेकाॅर्ड करण्याचा पर्याय दिला जातो. मात्र अनेक फोन्समध्ये ही ट्रिक काम करत नाही. आम्ही तुम्हाला अशीच एक ट्रिक सांगणार आहोत, जी अँड्राॅईड आणि आयओएसमध्ये वापरणे सोप्पे आहे.

ट्रेंडिंग न्यूज

YouTuber बनायचे आहे? यशस्वी युट्यूबर बनण्यासाठी काय करावे?

adani group stock : अदानीच्या 'या' पावरफुल शेअरनं रचला नवा विक्रम; अवघ्या १५ महिन्यांत तब्बल ३६३ टक्के वाढ

Upcoming Smartphones: कमी किंमतीत जबरदस्त फीचर्स; मे महिन्यात बाजारात धुमाकूळ घालायला येत आहेत 'हे' ५ स्मार्टफोन!

Buddha Purnima bank holiday: बुद्ध पौर्णिमेला बँका बंद आहेत का? पाहा राज्यनिहाय यादी

१. काॅल रेकाॅर्डर - क्युब एसीआर अॅप ओपन करा. अॅप वापरासाठी मागण्यात येणारी परवानगी ओके करा.

२. असे केल्यानंतर एखादा व्हाॅट्सअॅप काॅल रिसीव्ह अथवा डायल करण्याच्या स्थितीत एक विडगेज ओपन होईल.

३. जर विडगेज दिसले नाही तर काॅल रेकाॅर्डर - क्यूब एसीआर अॅप ओपन झाल्यानंतर फोर्स वोल्पी काॅल्स अॅज अ वाॅईस काॅल निवडा

४. या अॅपच्या माध्यमातून तुम्हाला काॅल रेकाॅर्ड करता येईल. आणि आॅडिओ क्लिपही मोबाईलच्या फाईल्समध्ये सेव्ह केली जाईल.

या अॅपच्या माध्यमातूनच व्हाॅट्सअॅपसोबत, झूम, सिग्नल आणि टेलिग्रामसारख्या प्लॅटफाॅर्मवरील काॅल्सही रेकाॅर्ड करता येतात.

आयफोन यूजर्ससाठी व्हाॅट्अॅप काॅल रेकाॅर्डिंग करणे थोडे कठीण होते. कारण त्यासाठी त्यांना मॅक डिव्हाईसची गरज लागू शकते. यानंतर मॅकमध्ये क्विक टाईम अॅप डाऊनलोड करावे लागेल आणि त्यानंतरच पुढीलप्रमाणे दिलेल्या स्टेप्सनुसार ते काॅल रेकाॅर्ड करु शकतात.

१. आयफोन मॅकशी कनेक्ट करा. त्यात क्विक टाईम अॅप्लिकेशन ओपन करा.

२. यातील फाईल आॅप्शनमध्ये गेल्यानंतर न्यू आॅडिओ रेकाॅर्डिंगवर क्लिक कराले लागेल.

३. आता आयफोनची निवड केल्यानंतर क्विक टाईममध्ये दिलेल्या रेकाॅर्ड बटनवर क्लिक करा.

४. यानंतर आपण आपल्या फोनच्या मदतीने व्हाॅट्सअॅप काॅल करु शकतात आणि त्यानंतर हे रेकाॅर्डिंग मॅकमध्ये सेव्ह होईल.

 

पुढील बातम्या