मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Uniparts India IPO : यूनिपार्ट्स इंडियाचा आयपीओ ३० नोव्हेंबरला येणार, ग्रे मार्केटमध्ये चर्चा सुरु

Uniparts India IPO : यूनिपार्ट्स इंडियाचा आयपीओ ३० नोव्हेंबरला येणार, ग्रे मार्केटमध्ये चर्चा सुरु

Nov 24, 2022, 05:31 PM IST

    • यूनिपार्टस् इंडियाचा आयपीओ ३० नोव्हेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे.  या आगामी आयपीओमध्ये गुंतवणूकदार २ डिसेंबरपर्यंत गुंतवणूक करू शकतात.
IPO HT

यूनिपार्टस् इंडियाचा आयपीओ ३० नोव्हेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे. या आगामी आयपीओमध्ये गुंतवणूकदार २ डिसेंबरपर्यंत गुंतवणूक करू शकतात.

    • यूनिपार्टस् इंडियाचा आयपीओ ३० नोव्हेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे.  या आगामी आयपीओमध्ये गुंतवणूकदार २ डिसेंबरपर्यंत गुंतवणूक करू शकतात.

अभियांत्रिकी प्रणाली आणि उपाय प्रदान करणारी कंपनी यूनिपार्ट्स इंडियाचा आयपीओ ३० नोव्हेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे. गुंतवणूकदारांना यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी मिळणार आहे. म्हणजेच हा आयपीओ २ डिसेंबर रोजी बंद होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Govt Savings schemes : दररोज फक्त २५० रुपये गुंतवा आणि २४ लाख मिळवा! ‘ही’ सरकारी योजना तुम्हाला बनवेल लखपती

China Gold Purchase : सोनं महाग होण्यामागे चीनचा हात, नेमकं काय करतोय चिनी ड्रॅगन

Amazon Summer Sale: कडक उन्हाळ्यात थंड हवेचा आनंद; एसीच्या खरेदीवर अ‍ॅमेझॉन देतोय ५५ टक्के सूट!

NBFC FD Rates : 'या' पाच वित्तीय कंपन्या एफडीवर देतायत ७ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज, जाणून घ्या सविस्तर

रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (RHP) नुसार, अँकर गुंतवणूकदारांना २९ नोव्हेंबर रोजी बोली लावण्याची संधी मिळणार आहे. हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल (ओएफएस) वर आधारित आहे. १४,४८१,९४२ इक्विटी शेअर्स ओएफएसद्वारे प्रवर्तक समूह संस्था आणि विद्यमान गुंतवणूकदारांद्वारे विकले जातील.

ओएफएसमध्ये शेअर्स ऑफर करणाऱ्यांमध्ये प्रवर्तक समूह संस्थांमध्ये द करण सोनी २०१८ सीजी -एनजी नेवाडा ट्रस्ट, द मेहर सोनी २०१८ सीजी-एनजी नेवाडा ट्रस्ट, पामेला सोनी आणि गुंतवणूकदार अशोका इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्स लिमिटेड आणि अंबादेवी मॉरिशस होल्डिंग लिमिटेड यांचा समावेश आहे. आयपीओ पूर्णपणे ओएफएस असणार आहे. त्यामुळे कंपनीला पब्लिक इश्यूमधून कोणतेही उत्पन्न मिळणार नाही.

कंपनीने तिसऱ्यांदा आयपीओ आणण्याचा प्रयत्न केला आहे. यूनिपार्टसने यापूर्वी डिसेंबर २०१८ आणि सप्टेंबर २०१४ मध्ये सेबीकडे आयपीओसाठी कागदपत्रे सादर केली होती त्यांना मान्यता देखील मिळाली होती, परंतु आयपीओ आणला नाही.

 

विभाग