मराठी बातम्या  /  business  /  Share tips : हे तीन बॅक स्टाॅक्स आत्ताच खरेदी करा, करतील तुम्हाला मालामाल
Bank stocks HT
Bank stocks HT

Share tips : हे तीन बॅक स्टाॅक्स आत्ताच खरेदी करा, करतील तुम्हाला मालामाल

21 November 2022, 9:30 ISTKulkarni Rutuja Sudeep

अॅक्सिस बॅकेच्या स्टाॅक खरेदीसाठी ३६ पैकी ३० जणांनी खरेदीचा कौल दिला आहे. याचप्रमाणे आयसीआयसीआय आणि एसबीआय़ बॅकेच्या स्टाॅक खरेदीसाठीही तज्ज्ञांनी 'बाय नाऊ' म्हटले आहे.

Multibagger Bank Stocks to buy : बॅक स्टाॅकच्या अप्रतीम मार्जिन आऊटलूक आणि मालमत्तेची गुणवत्ता यांच्या आधारे १७ नोव्हेंबरला बॅक निफ्टीने ४२६२२ अंशाच्या सर्वोत्कृष्ट पातळीला स्पर्श केला आहे.गेल्या काही महिन्यांपासून सरकारी आणि खाजगी बॅक स्टाॅकमध्ये चांगली वाढ दिसून आली. तज्ज्ञांच्या मते अॅक्सिस बॅक, आयसीआयसीआय बॅक आणि एसबीआय़ बॅकेच्या शेअर्स हे आगामी काळात उच्च रकमेचा परतावा देऊ शकतात.

ट्रेंडिंग न्यूज

अॅक्सिस स्टाॅक

अॅक्सिस बॅकेची कर्ज मागणी चांगली असून उच्च मार्जिन सेगमेंटमध्ये चांगल्या वाढीची अपेक्षा आहे. मालमत्तेच्या गुणवत्तेबाबत सध्या कोणत्याही प्रकारची चिंता नाही. माॅर्गन स्टेनले पतमानांकन संस्थेने या बॅक स्टाॅकसाठी ११५० रुपये टार्गेट प्राईज दिली आहे. तज्ज्ञांच्या ३६ पैकी ३० जणांनाी अॅक्सिस बॅकेसाठी बाय नाऊ म्हटले आहे.

आयसीआयसीआय बॅक

आयसीआयसीआय बॅकेच्या शेअर्सबाबतही तज्ज्ञ बुलिश आहेत. ब्रोकरेज हाऊसेससाठी बॅक टाॅप पिक बनला आहे. काही तज्ज्ञांनी आयसीआयसीआय बॅकेसाठी १२०० रुपये टार्गेटसह खरेदीचा सल्ला दिला आहे. चांगल्या प्रकारची मालमत्ता गुणवत्ता, नेट इंटरेट मार्जिनचे सकारात्मक आऊटलूक यांमुळे बॅकेचा व्यवसाय प्रगतीपथावर आहे.

एसबीआय स्टाॅक

१८ नोव्हेंबरला एसबीआयचा स्टाॅक ६०२.७० रुपयांवर बंद झाला. एसबीआयबद्दल ३८ पैकी ३१ तज्ज्ञांनी खरेदीचा सल्ला दिला आहे. ५ जणांनी बाय रेटिंग तर २ जणांनी होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. एसबीआयची टार्गेट प्राईज ७१५ रुपये आहे.

(डिस्‍क्‍लेमर: ही माहिती केवळ कंपन्यांच्या शेअर मार्केटमधील कामगिरीवर आधारीत आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं वाचकांनी आपल्या वित्तीय सल्लागाराच्या सुचनेनुसारच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.)