मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Paytm IPO: पेटीएम ठरला गेल्या दहा वर्षांतला जगातला सगळ्यात खराब आयपीओ; गुंतवणूकदार बरबाद

Paytm IPO: पेटीएम ठरला गेल्या दहा वर्षांतला जगातला सगळ्यात खराब आयपीओ; गुंतवणूकदार बरबाद

Nov 24, 2022, 03:11 PM IST

  • Paytm IPO: पेटीएमचा शेअर सातत्यानं घसरत असून आतापर्यंत या शेअरनं गुंतवणूकदारांचं ७९ टक्के नुकसान केलं आहे.

Paytm

Paytm IPO: पेटीएमचा शेअर सातत्यानं घसरत असून आतापर्यंत या शेअरनं गुंतवणूकदारांचं ७९ टक्के नुकसान केलं आहे.

  • Paytm IPO: पेटीएमचा शेअर सातत्यानं घसरत असून आतापर्यंत या शेअरनं गुंतवणूकदारांचं ७९ टक्के नुकसान केलं आहे.

Paytm IPO: देशातील सर्वात मोठा आयपीओ असा गाजावाजा झालेला पेटीएम कंपनीचा आयपीओ प्रत्यक्षात मागच्या दहा वर्षातला जगातील सर्वात खराब आयपीओ ठरला आहे. पेटीएमचा आयपीओ घेणारे गुंतवणूकदार अक्षरश: धुपून निघाले आहेत. गुंतवणूकदारांना तब्बल ७९ टक्क्यांचा फटका बसला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात पेटीएमचा आयपीओ आला होता. डिजिटल पेमेंटमधील एक नावाजलेली आणि सर्वांच्या तोंडावर नाव असलेल्या या कंपनीच्या आयपीओची साहजिकच मोठी चर्चा झाली. या आयपीओची तुलना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क याच्या टेस्ला कंपनीच्या आयपीओशी झाली होती. त्यामुळं गुंतवणूकदारांनीही मोठ्या आशेनं यात गुंतवणूक केली होती. मात्र, हा आयपीओ म्हणजे एक भलामोठा बुडबुडा ठरला आहे. 

शेअर बाजारात लिस्ट झाल्याच्या दिवसापासून पेटीएमचा आयपीओ सातत्यानं घसरणीचे नवनवे विक्रम नोंदवत आहे. लिस्टिंगनंतर अत्यंत कमी कालावधीतच पेटीएमच्या शेअरचा भाव ५० टक्क्यांच्याही खाली गेला होता. त्यामुळं भाववाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या गुंतवणूकदारांची चांगलीच कोंडी झाली. त्यानंतर रोजच्या रोज पेटीएम पडत आहे. काही गुंतवणूकदार मोठा तोटा सहन करून बाहेर पडले आहेत. किमान पैसे मिळवण्याच्या आशेवर असलेल्या गुंतवणूकादार आता पुरते अडकले आहेत.

'ब्लूमबर्ग शो'नं विविध आयपीओंच्या कामगिरीचा आढावा घेऊन एकत्र केलेल्या आकडेवारीनुसार, मागील दहा वर्षांत जगात आलेल्या आयपीओंपैकी पेटीएम सर्वात वाईट आयपीओ आहे. आतापर्यंत पेटीएमनं गुंतवणूकदारांना ७९ टक्के तोट्याचा झटका दिला आहे. यापूर्वी २०१२ मध्ये स्पेनच्या 'बांकिया एसए' हा शेअर तब्बल ८२ टक्क्यांनी घसरला होता.

काय आहे आजची परिस्थिती?

आजही पेटीएमच्या शेअरचा भाव घसरला असून सध्या हा शेअर ४४२ रुपयांवर ट्रेड करत आहे. पेटीएमच्या एका शेअरची इश्यू प्राइस २१५० इतकी होती. मात्र, लिस्टिंगनंतरही एकदाही हा आकडा पेटीएमला गाठता आलेला नाही.

विभाग

पुढील बातम्या