LIC Policy : भारतीय जीवन विमा निगम अर्थात एलआयसी ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. एलआयसी वेळोवेळी विविध विमा पाँलिसी जाहीर करते. पण अनेकदा काही अपरिहार्य कारणास्तव ती बंद करावी लागते. कंपनीने नुकतेच त्यांच्या दोन लोकप्रिय योजना बंद केल्या आहेत. जीवन अमर आणि टेक टर्म इन्शुरन्स या दोन योजनांचा त्यात समावेश आहे.
नेमकं कारण काय ?
उपलब्ध माहितीनुसार, कंपनीने रि इन्शुअरन्स रेटमधील वाढीनंतर हा निर्णय घेतला आहे.
जाणून घ्या विमा पाॅलिसीसंदर्भातील संपूर्ण माहिती
कंपनीची ही योजना संपूर्णपणे प्युअर टर्म इन्शुअरन्स होती. या योजनेला कंपनीला १ सप्टेंबर २०१९ ला दाखल करण्यात आले होते. ही नाँन लिक्ड, शुद्ध सुरक्षा असलेली पाँलीसी होती. याअंतर्गत विमा धारकांना आणि त्यांच्या कुटूंबियांना कोणत्याही आपातकालीन परिस्थितीत सुरक्षा दिली जात होती. या पाँलिसीचा मच्योरिटी कालावधी ८० वर्षांपर्यंत होता. यात अंदाजे ५० लाखांपर्यत विमा काढण्याची मर्यादा होती.
संबंधित बातम्या